WPL 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

WPL 2026: जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज; सराव करण्यासाठी खेळाडू गोव्याच्या मैदानात Watch Video

WPL 2026 Delhi Team Goa:'विमेन्स प्रीमियर लीग' (WPL) च्या चौथ्या हंगामाचे बिगुल वाजले असून, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यंदा चषकावर नाव कोरण्यासाठी कंबर कसली आहे.

Sameer Amunekar

'विमेन्स प्रीमियर लीग' (WPL) च्या चौथ्या हंगामाचे बिगुल वाजले असून, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यंदा चषकावर नाव कोरण्यासाठी कंबर कसली आहे. सलग तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या दिल्लीच्या संघाने आपली रणनीती बदलली असून, प्रशिक्षणाच्या तयारीसाठी गोव्याची निवड केली आहे. गोव्याच्या प्रसन्न वातावरणात दिल्ली कॅपिटल्सचे 'प्री-सीजन' कॅम्प सुरू झाले असून, खेळाडूंनी मैदानावर घाम गाळण्यास सुरुवात केली आहे.

विदेशी स्टार खेळाडूंचे कॅम्पमध्ये आगमन

यंदाच्या सराव शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मारिझान कॅप आणि यष्टिरक्षक फलंदाज लिझेल ली. या दोन्ही स्टार खेळाडूंनी अलीकडेच 'विमेन्स बिग बॅश लीग'मध्ये होबार्ट हरिकेन्सला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

या अनुभवी खेळाडूंसोबतच तानिया भाटिया, मिन्नू मणी, ममता मडीवाला यांसारख्या भारतीय प्रतिभेनेही सराव सत्रात आपला सहभाग नोंदवला आहे. इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू लूसी हॅमिल्टन देखील सुरुवातीच्या गटात सामील झाली असून, प्रशिक्षक जोनाथन बॅटी यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहे.

प्रशिक्षक आणि सीईओंचा विजयाचा 'मास्टर प्लॅन'

मुख्य प्रशिक्षक जोनाथन बॅटी यांच्या मते, गोव्याचे हवामान सरावासाठी अतिशय पोषक आहे. संघात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश झाला असून, त्यांना संघाच्या कार्यसंस्कृतीशी जोडून घेणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संघाचे सीईओ सुनील गुप्ता यांनी स्पष्ट केले की, दिल्ली कॅपिटल्स ही केवळ एक टीम नसून एक कुटुंब आहे. सलग तीन फायनल गाठल्यानंतर आता सातत्य टिकवून ठेवत विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणे हेच आमचे लक्ष्य आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, मंगळवारी मालिका संपल्यानंतर ते थेट संघात सामील होतील.

मुंबई इंडियन्सविरुद्ध 'मुकाबला'

दिल्ली कॅपिटल्स आपल्या मोहिमेची सुरुवात १० जानेवारी रोजी नवी मुंबई येथे करणार आहे. त्यांचा पहिला सामना दोन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबईविरुद्धच्या या महत्त्वाच्या लढतीपूर्वी संघात समन्वय साधण्यासाठी गोवा हे सर्वोत्तम ठिकाण असल्याचे फ्रँचायझीने म्हटले आहे. येथे केवळ क्रिकेटचा सरावच नाही, तर खेळाडूंमधील मैत्री घट्ट करण्यासाठी 'फन ॲक्टिव्हिटी'वरही भर दिला जात आहे. मुंबईला रवाना होण्यापूर्वी पूर्ण ताकदीनिशी सराव पूर्ण करून मैदानात उतरण्यासाठी संघ सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' सुशासनाची तहान भागवेल? - संपादकीय

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

Goa Live News: कोकण रेल्वे पोलिसांची 2025 मधील कामगिरी; 32 लाखांचा चोरीचा माल जप्त

SCROLL FOR NEXT