West Zone Athletics Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

West Zone Athletics Championship Goa: कुजिरा येथील अटल स्टेडियमवर होणाऱ्या ३७व्या पश्चिम विभागीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी यजमान सज्ज झाले असून गोव्याचे १२४ ॲथलीट्स पदकासाठी कौशल्य पणाला लावतील. स्पर्धा २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत होईल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कुजिरा येथील अटल स्टेडियमवर होणाऱ्या ३७व्या पश्चिम विभागीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी यजमान सज्ज झाले असून गोव्याचे १२४ ॲथलीट्स पदकासाठी कौशल्य पणाला लावतील. स्पर्धा २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत होईल.

गोवा ॲथलेटिक असोसिएशनतर्फे भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात येत आहे.

स्पर्धेतील सहभागी ॲथलीट्सना गुरुवारी खेळण्याचे साहित्य प्रदान करण्यात आले. यजमान संघातील खेळाडूंना शुभेच्छा देताना गोवा ॲथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले, की स्पर्धेच्या सुसूत्र आयोजनावर भर देण्यात आला असून स्पर्धेच्या माध्यमातून ज्युनियर पातळीवरील दर्जेदार गुणवत्तेला व्यासपीठ मिळत आहे.

गोव्यातील ॲथलीट्सनही मोठी संधी असून चांगले व्यासपीठ प्राप्त होत आहे. त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे, निश्चितच ते अभिमानास्पद कामगिरी बजावतील या विश्वास वाटतो.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत यजमान गोव्यासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, दमण-दीव, दादरा नगर हवेली येथील क्रीडापटू भाग घेतील. विविध संघांचे मिळून सुमारे ८०० स्पर्धक भाग घेतील. स्पर्धा विविध प्रकारांत होईल.

स्पर्धेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून उत्स्फूर्त पाठिंबा लाभल्यामुळे आम्ही ही मोठी स्पर्धा घेऊ शकलो, असे ॲड. सावईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT