Vijay Merchant Trophy:  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Merchant Trophy: बंगालची जोरदार मुसंडी! फलंदाजांनी शिकवला गोव्याच्या गोलंदाजांना धडा; उभारली मोठी धावसंख्या

West Bengal Vs Goa: बंगालने गोव्याविरुद्ध पाच विकेट ५१ धावात गमावल्या, पण त्यानंतरही त्यांनी जोरदार मुसंडी मारत दिवसअखेर ७ बाद ३०५ धावांची भक्कम मजल मारली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: विजय मर्चंट करंडक सोळा वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी बंगालने गोव्याविरुद्ध पाच विकेट ५१ धावात गमावल्या, पण त्यानंतरही त्यांनी जोरदार मुसंडी मारत दिवसअखेर ७ बाद ३०५ धावांची भक्कम मजल मारली. त्यांचा कर्णधार सचिन यादव याने नाबाद शतक झळकावले. सामना सूरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर सुरू आहे.

तीन दिवसीय सामन्याला बुधवारपासून सुरवात झाली. बंगालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. कर्णधार शमिक कामत व शिवम सिंग यांनी नव्या चेंडूने प्रभावी मारा करताना बंगालला कोंडीत पकडले. डावातील अठराव्या षटकात बंगालची ५ बाद ५१ धावा अशी घसरगुंडी उडाली होती, नंतर गोव्याच्या गोलंदाजांना वर्चस्व राखणे शक्य झाले नाही. त्यामुळे बंगालने सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर त्रिशतक गाठले.

बंगालच्या राजदीप खान व अगस्त्य शुक्ला यांनी शानदार अर्धशतके नोंदविताना सहाव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करून संघाला कठीण प्रसंगी सावरले. राजदीपने १६९ चेंडूत नऊ चौकारांसह ६३ धावा केल्या. अगस्त्य याने आक्रमक फलंदाजी करताना ६९ चेंडूत ११ चौकारांसह ६६ धावा नोंदविल्या. फिरकी गोलंदाज मोहित यादव याने अगस्त्य याला पायाचीत करून जमलेली जोडी फोडली. त्यानंतर राजदीप याने कर्णधार सचिन यादव यांच्या समवेत सातव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करून बंगालला द्विशतक गाठून दिले.

राजदीप यालाही मोहितने पायचीत केले. नंतर कर्णधार सचिनने डाव सावरताना प्रेक्षणीय शतकी खेळी केली. दिवसअखेर तो १०२ धावांवर खेळत होता. त्याने १४१ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार व एक षटकार मारला. कर्णधारास चांगली साथ देताना पापाई बोराई याने नाबाद २१ धावा केल्या. सचिन व बोराई यांनी आठव्या विकेटसाठी ८४ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. गोव्यातर्फे (Goa) शमिक कामत, शिवम सिंग व मोहित यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT