
Vijay Merchant Trophy 2024 25 Surat
पणजी: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू शमिक कामत गोव्याच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तीन दिवसीय सामन्यांची स्पर्धा सहा डिसेंबरपासून गुजरातमधील सूरत येथे खेळली जाईल.
गोव्याच्या ‘ई’ गटात बडोदा, बंगाल, पुदुचेरी, महाराष्ट्र व तमिळनाडू या संघांचा समावेश आहे. साखळी फेरीतील अखेरचा सामना २८ डिसेंबरपासून खेळला जाईल.
गोव्याचा संघ ः शमिक कामत (कर्णधार), साईराज गोवेकर, सर्वांभ नाईक, विनीत कामत, आफ्रिद साब, साई नाईक, अरमान नदाफ, स्वराज फडते, सुदित गुरव, मोहित यादव, आहन दयाल, शिवम सिंग, राज बांदेकर, कार्तिक वडार, संचित नाईक, बरहान दास, राखीव ः सानिध्य सावंत, पलिन पागी, साईराज नाईक, व्रत धुरी, शौर्य फडते, कुशल मोरजकर, फरहान साब.
गोव्याचे वेळापत्रक ः तारीख ६ ते ८ डिसेंबर ः विरुद्ध बडोदा, तारीख ११ ते १३ डिसेंबर ः विरुद्ध बंगाल, तारीख १७ ते १९ डिसेंबर ः विरुद्ध पुदुचेरी, तारीख २२ ते २४ डिसेंबर ः विरुद्ध महाराष्ट्र, तारीख २८ ते ३० डिसेंबर ः विरुद्ध तमिळनाडू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.