Vijay Merchant Trophy: बडोद्याविरुद्धचा सामना अनिर्णित! गोव्याच्या फलंदाजांची यशस्वी झुंज
Vijay Merchant U 16 Trophy 2024 Goa Vs Baroda
पणजी: फॉलोऑननंतर अर्धशतकवीर विनीत कामत याच्यासह गोव्याच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी केली, त्यामुळे १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट लढतीत बडोद्याला विजय नोंदविता आला नाही. शेवटच्या तिसऱ्या दिवशी रविवारी सामना अनिर्णित राहिला.
सामन्याच्या ई गटातील या लढतीतून बडोद्याच्या पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण, तर गोव्याला एक गुण मिळाला. बडोद्याने रविवारी सकाळी गोव्याचा पहिला डाव २४५ धावांत गुंडाळला. बडोद्याला १६५ धावांची आघाडी मिळाली. फॉलोऑननंतर गोव्याने दुसऱ्या डावात सर्वबाद २०१ धावा करून ३६ धावांची आघाडी प्राप्त केली. ३७ धावांचे लक्ष्य गाठणे वेळेअभावी बडोद्याला शक्य झाले नाही.
गोव्याच्या दुसऱ्या डावात विनीत कामत (५४ धावा, १४४ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) व कर्णधार शमिक कामत (३३ धावा, १२८ चेंडू, ३ चौकार) यांनी ३३.५ षटकांत सहाव्या विकेटसाठी केलेली ७५ धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. याशिवाय सलामीचा सर्वांभ नाईक (३७ धावा, १२० चेंडू, ३ चौकार) व तळात मोहित यादव (३५ धावा, ६१ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले.
संक्षिप्त धावफलक
बडोदा, पहिला डाव ः ९ बाद ४१० घोषित. गोवा, पहिला डाव (८ बाद २१६ वरून) ः ८७.३ षटकांत सर्वबाद २४५ (मोहित यादव ४३, शिवम सिंग नाबाद १५, संचित नाईक ०) व फॉलोऑननंतर दुसरा डाव ः ९५.३ षटकांत सर्वबाद २०१ (सर्वांभ नाईक ३७, साईराज गोवेकर १३, अरमान नदाफ ६, आफ्रिद साब ३, शुदित गुरव ०, विनीत कामत ५४, शमिक कामत ३३, मोहित यादव ३५, साई नाईक ०, शिवम सिंग नाबाद ०, संचित नाईक ४, ओमी पटेल ६-७१, तिलक पटेल २-२६).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.