Divjotsav 2025: पेटती पणती मालवली, निवेलीच्या कांड्यात लावली ज्योत; भक्तीचा अनोखा 'दिवजोत्सव'

Divjotsav in Goa: तामणे-लोलये येथील श्री चामुंडेश्‍‍वरी-कुडतर देवस्थानाचा अनोखा ‘निवेलीच्या कांड्यातील’ दिवजोत्सव कार्तिकी द्वादशीला मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
Divjotsav
Divjotsav Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: तामणे-लोलये येथील श्री चामुंडेश्‍‍वरी-कुडतर देवस्थानाचा अनोखा ‘निवेलीच्या कांड्यातील’ दिवजोत्सव कार्तिकी द्वादशीला मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

राज्यातील हा असा एकमेव उत्सव आहे, ज्यात कापसाची वात आणि तेल खालून पेटवून निवेलीच्या पोकळ कांड्यात दिवा लावला जातो. या अनोख्या परंपरेमागे अनेक शतकांची धार्मिक परंपरा आहे.

या देवस्थानचे एक वयोवृद्ध भक्त केशव पागी यांनी सांगितले की, पूर्वजांचे कुलदैवत पाड्डी-केपे येथील श्री चामुंडेश्‍‍वरी-कुडतर देवस्‍थान आहे. प्राचीन काळी भाविक मंडळी कार्तिकी द्वादशीच्या दिवशी पाड्डे-केपे येथून पेटती पणती (प्रदीप) घेऊन देवदर्शनासाठी मार्गक्रमण करत असत. मात्र मार्गात ती पणती रानात मालवली, तेव्हा पर्याय म्हणून त्यांनी निवडुंग जातीच्या निवेलीच्या पोकळ कांड्याचा उपयोग केला. तेव्हापासून या दिवजोत्सवाची परंपरा आजवर कायम आहे.

Divjotsav
Divjotsav: दिवजांच्या प्रकाशाने उजळली मंदिरे! भजन, पालखी, गाऱ्हाणी सादर; पारंपरिक पद्धतीने दिवजोत्सव साजरा

या उत्सवात महिला दोन्ही हातातील दहा बोटांमध्ये पेटत्या निवेलीच्या कांड्या धरून देवीला ओवाळतात. त्यांचे पती केळीच्या पात्यात वाती पेटवून देवीला ओवाळतात. याला ‘जोड्याने ओवाळणे’ असे म्हणतात. त्याच दिवशी तुळशीला दिवजांनी ओवाळण्याची प्रथा पाळली जाते. तामणे-लोलयेपासून ते काणकोण-कारवारपर्यंत पसरलेल्या सत्तरहून अधिक पागी समाजातील भजक कुटुंबांचा या उत्सवाशी संबंध आहे. हे सर्व जण कार्तिकी द्वादशी, तुळशी विवाह आणि इतर धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात.

Divjotsav
Republic Day 2025: दिवजोत्सव, कावी आर्ट आणि पर्यटनाची अनोखी सांगड; असा असेल गोव्याचा चित्ररथ

कारीटांच्या पणत्यांची परंपरा

पूर्वीच्या काळात कारीटांचा उपयोग पणती म्‍हणून केला जाई. त्या पणतीत तेल व वात घालून शेणाच्या गोळ्यावर ठेवून कार्तिकी पौर्णिमेला दीपराधना करण्याची परंपरा होती. काळाच्या ओघात ही परंपरा लुप्‍त झाली असली तरी तामणे-लोलये येथील भक्तांनी जुनी परंपरा आजही जिवंत ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com