Vizzy Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vizzy Trophy: दक्षिण, पश्चिम विभागाची विजयी सलामी; मॅकनील हेडली, रामदेव आचार्य यांची 'मॅचविनिंग' अर्धशतके

Vizzy Trophy Cricket 2026 South Zone Win: विद्यापीठ पातळीवरील आंतरविभागीय विझी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण विभाग, तसेच गतविजेत्या पश्चिम विभागाने विजयी सलामी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विद्यापीठ पातळीवरील आंतरविभागीय विझी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण विभाग, तसेच गतविजेत्या पश्चिम विभागाने विजयी सलामी दिली.

पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर दक्षिण विभागाने मॅकनील हेडली याच्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर पूर्व विभागास ५९ धावांनी सहज हरविले. कर्नाटककडून टी-२० प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या मॅकनिल याने ६४ चेंडूंत ७७ धावा करताना सात उत्तुंग षटकार खेचले. त्याने दोन चौकारही मारले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर चुरशीच्या लढतीत पश्चिम विभागाने उत्तर विभागास दोन विकेट राखून हरविले. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीचा रामदेव आचार्य याने केलेल्या नाबाद ७७ धावा पश्चिम विभागासाठी मौल्यवान ठरल्या. सौराष्ट्राच्या फलंदाजाने ९० चेंडूंतील खेळीत चार चौकार व तीन षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण विभाग ः ३४.३ षटकांत सर्वबाद १८४ (सीएचव्ही अन्वित रेड्डी २७, पारस राज २५, मॅकनील हेडली ७७, गणेश तोमर २-३६, अभ्युदय सिंग ४-२९) वि. वि. पूर्व विभाग ः ३८.५ षटकांत सर्वबाद १२५ (शुभम सिंग ४७, श्रीदम पॉल १९, विनायक साहू १९, डी. सात्विक २-२१, समर्थ हेगडे ३-२५).

उत्तर विभाग ः ४२.१ षटकांत सर्वबाद १८० (श्रेष्ठ यादव ३०, कार्तिक शर्मा ३४, रिंकू घंघास ३१, महंमद सिबतैन नाबाद २५, सलाऊद्दीन ३-२८, आदित्यराज राठोड ४-४२, लकीराजसिंह वाघेला २-२५) पराभूत वि. पश्चिम विभाग ः ३० षटकांत ८ बाद १८१ (रामदेव आचार्य नाबाद ७७, दिव्य गजराज ३२, अमित राठोड १६, तन्मय तिवारी १७, अरमान वाधवा ३-५१, रिंकू घंघास २-३४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT