Virat Kohli ODI Century Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Virat Kohli ODI Century: शतकांच्या बादशाहचा रायपूरमध्ये धमाका! किंग कोहलीने ठोकले वनडे कारकिर्दीतील 53वे शतक; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड धोक्यात VIDEO

Virat Kohli 53rd ODI Century: दुसऱ्या वनडे सामन्यात विराटने आपले शतक केवळ 90 चेंडूंमध्ये पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील विराट कोहलीचे हे 53वे शतक आहे.

Manish Jadhav

Virat Kohli 53rd ODI Century: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार शतक ठोकले. यापूर्वी, रांची येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने 135 धावांची दमदार खेळी खेळली होती. त्यानंतर आता रायपूर येथे दुसऱ्या सामन्यातही कोहलीने 90 चेंडूत 'विराट' शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील विराट कोहलीचे हे 53वे शतक आहे. या शतकी खेळीच्या जोरावर किंग कोहलीने विक्रमांच्या यादीत आणखी एक मोठी झेप घेतली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आफ्रिकेविरुद्ध विक्रमी शतक

विराटने या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (सर्व तिन्ही फॉरमॅट- कसोटी, वनडे आणि टी-20) सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये मिळून विराट कोहलीचे हे 10वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. या 10व्या शतकामुळे विराट कोहली (Virat Kohli) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. या यादीत आता तो फक्त महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या मागे आहे. सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण 12शतके झळकावली आहेत.

विराट (10 शतके) आणि सचिन तेंडुलकर (12 शतके) यांच्यात आता फक्त दोन शतकांचा फरक आहे. 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबद्दल चर्चा सुरु असतानाच कोहलीने सातत्याने केलेल्या या दमदार कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पॉन्टिंग आणि विल्यमसनच्या विक्रमाची बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या विक्रमाशी बरोबर केली. पॉन्टिंग, वॉर्नर आणि विल्यमसन या तिघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही फॉरमॅट मिळून 10 शतके झळकावली. या तिन्ही दिग्गजांच्या बरोबरीने कोहलीनेही आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 शतके पूर्ण केली असून तो या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला.

कोहलीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड नेहमीच शानदार राहिला आहे, जो त्याने या वनडे मालिकेतही कायम ठेवला. एकाच मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक असून त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील एकूण 53शतकांचा टप्पा गाठला. कोहलीची ही शानदार खेळी केवळ वैयक्तिक विक्रमच नाही, तर आगामी 2027 वर्ल्ड कपसाठी त्याच्या तयारीचा आणि फॉर्मचा पुरावा आहे.

102 धावांची तूफानी खेळी

शतक ठोकल्यानंतर लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 102 धावांवर खेळत असताना विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या शतकादरम्यान विराटने 93 चेंडूंचा सामना केला, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. या शानदार खेळीदरम्यान कोहलीने ऋतुराज गायकवाडसोबत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या तीन वनडे डावात कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी कामगिरी दाखवली आणि प्रत्येक डावात शतके झळकावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

SCROLL FOR NEXT