Goa Ranji Cricket Match  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Vs Gujarat Cricket Match: विनू मांकड करंडक १९ वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला अखेरच्या गटसाखळी लढतीतही पराभव पत्करावा लागला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विनू मांकड करंडक १९ वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला अखेरच्या गटसाखळी लढतीतही पराभव पत्करावा लागला. गुजरातने ११६ धावांनी दणदणीत विजय संपादला. एलिट अ गट सामना शुक्रवारी हरियानातील सुलतानपूर येथील गुरुग्राम क्रिकेट मैदानावर झाला.

गोव्याचा हा पाच लढतीतील चौथा पराभव ठरला. फक्त एका विजयामुळे त्यांना चार गुण मिळाले. शुक्रवारी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. निर्धारित ५० षटकांत त्यांनी ७ बाद २९५ धावा केल्या.

गोव्याला हे आव्हान पेलवले नाही. सलामीचा आदित्य कोटा (५४ धावा, ९० चेंडू, ५ चौकार, २ षटकार) व कर्णधार यश कसवणकर (६७ धावा, ८२ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) यांच्या अर्धशतकांनंतरही गोव्याचा डाव ४३.३ षटकांत १७९ धावांत संपुष्टात आला. आदित्य व यश यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

गुजरात ः ५० षटकांत ७ बाद २९५ (मानस दवे ७५, मौल्यराजसिंग चावडा ८५, वेदांत त्रिवेदी नाबाद ८०, समर्थ राणे ९-१-४९-३, चिगुरुपती व्यंकट १०-०-७२-१, यश कसवणकर १०-०-५७-१, शिवेन बोरकर १०-०-५२-१, जय कांगुरी ५-०-३५-०, आराध्य गोयल ६-०-२३-१)

वि. वि. गोवा ः ४३.३ षटकांत सर्वबाद १७९ (आदित्य कोटा ५४, अभियश सूर्यवंशी १, शंतनू नेवगी १३, यश कसवणकर ६७, दिशांक मिस्कीन ४, आराध्य गोयल ०, नितीन घाडी ०, चिगुरुपती व्यंकट २५, शिवेन बोरकर १, समर्थ राणे ०, जय कांगुरी नाबाद ०, वासू देवानी ३-२१, काव्य पटेल २-२३, मीत पटेल २-३१, खिलन पटेल २-२८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT