Cricketer Dies on Field : 'तो' शेवटचा चेंडू ठरला आयुष्यातील अंतिम क्षण; हृदयविकाराच्या झटक्याने गोलंदाजाचा मैदानावरच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Ahmar Khan Moradabad Cricketer Death: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका क्रिकेट खेळाडूचा मृत्यू झाला. विजयानंतर आनंद साजरा करणाऱ्या गोलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Moradabad cricketer death
Moradabad Cricketer DeathDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झालेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सामन्याचा शेवटचा चेंडू टाकल्यानंतर मुरादाबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज अहमर खान (वय ५०) याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मैदानावर कोसळला. उपस्थितांनी तत्काळ मदत करत सीपीआर दिला आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही घटना मुरादाबादच्या बिलारी ब्लॉकमधील शुगर मिल मैदानावर घडली. येथे यूपी व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशन तर्फे सुरू असलेल्या स्पर्धेत मुरादाबाद आणि संभल संघांमध्ये सामना खेळला जात होता. मुरादाबाद संघाने प्रथम फलंदाजी करून चांगला स्कोअर उभारला होता. संभल संघाला लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या चार चेंडूत १४ धावा आवश्यक होत्या.

Moradabad cricketer death
Goa BJP: 'त्‍यांना सरकार, भाजपचे नाव बदनाम करायचे होते हे दिसून येते', काणकोणकरांच्या आरोपांवरती तानावडेंचे प्रत्त्युत्तर

निर्णायक क्षणी गोलंदाजीसाठी मुरादाबादचा अनुभवी डावखुरा गोलंदाज अहमर खान आला. त्याने तडफदार गोलंदाजी करत एकही चौकार न देता सामना मुरादाबादच्या नावावर ११ धावांनी मिळवून दिला. विजयाचा आनंद साजरा होण्याआधीच दुर्दैवी घटना घडली. शेवटचा चेंडू टाकल्यानंतर अहमर खान मैदानावर बसला आणि काही क्षणांतच कोसळला.

Moradabad cricketer death
Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

त्याचा श्वास थांबल्याचे पाहून सहकारी खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने तत्काळ सीपीआर दिले, त्यानंतर थोडी हालचाल दिसली, मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Moradabad cricketer death
Formula 4 Race Goa: अखेर ‘फॉर्म्युला-४ रेस’ला ब्रेक! मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर; अन्यत्र होणार आयोजन

अहमर खान मुरादाबादच्या एकता विहार कॉलनीत राहत होता. तो उत्तर विभागाचा अनुभवी खेळाडू होता आणि नुकताच एका महत्त्वाच्या स्पर्धेतून परतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

या घटनेने संपूर्ण स्थानिक क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. सहकारी खेळाडूंसह चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, “मैदानावर लढत जीव दिला, खराखुरा क्रिकेटचा योद्धा!” अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com