Goa Cricket Canva
गोंयचें खेळामळ

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा 'विनू मांकड स्पर्धे'तील मोहिमेचा विजयाने समारोप; चंडीगढवर ४० धावांनी मात

Vinoo Mankad Cricket Trophy 2024: विनू मांकड करंडक एकदिवसीय सामन्यांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेचा समारोप विजयाने करताना गोव्याने चंडीगडला ४० धावांनी हरविले. सामना शनिवारी मल्लानपूर-मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: विनू मांकड करंडक एकदिवसीय सामन्यांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेचा समारोप विजयाने करताना गोव्याने चंडीगडला ४० धावांनी हरविले. सामना शनिवारी मल्लानपूर-मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला.

सलामीचा आदित्य कोटा (८६ धावा, १२३ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) व निसर्ग नागवेकर (५६ धावा, ७१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६० धावा केल्या. डावाच्या अखेरच्या टप्प्यात जीवनकुमार चित्तेम याने ३७ चेंडूंत पाच चौकारांसह केलेल्या ४५ धावांही गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. नंतर पहिलाच सामना खेळणारा मध्यमगती नील नेत्रावळकर (३-३९) व फिरकी अनुज यादव (३-३४) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर गोव्याने चंडीगडला ९ बाद २२० धावांत रोखले.

गोव्याने पाचपैकी दोन सामने जिंकले, तर तीन लढती गमावल्या. चंडीगडव्यतिरिक्त नागालँडला २८६ धावांनी हरविले होते. हिमाचल प्रदेशकडून ६९ धावांनी, आंध्र प्रदेशविरुद्ध चार विकेटने, तर हैदराबादविरुद्ध ३१ धावांनी पराभूत व्हावे लागले.

संक्षिप्त धावफलक ः गोवा ः ५० षटकांत ९ बाद २६० (शंतनू नेवगी १०, आदित्य कोटा ८६, निसर्ग नागवेकर ५६, यश कसवणकर ६, दिशांक मिस्कीन १३, जीवनकुमार चित्तेम ४५, वेदांत डब्राल ८, पुंडलिक नाईक ६, अनुज यादव ४, शमिक कामत नाबाद १६, नील नेत्रावळकर नाबाद ०, गगनप्रीत सिंग २-४७, जशन बेनीवाल ४-३३) वि. वि. चंडीगड ः ५० षटकांत ९ बाद २२० (बलराज सिंग ३६, रुपेश यादव ३२, एहित सलारिया २५, रुद्र पटियाल २५, रितिक संधू ३५, पुंडलिक नाईक ६-०-४७-०, शमिक कामत ७-०-२९-२, यश कसवणकर १०-०-४१-१, अनुज यादव १०-१-३४-३, वेदांत डब्राल ७-०-२६-०, नील नेत्रावळकर १०-०-३९-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

SCROLL FOR NEXT