Vijay Merchant Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Merchant Trophy: गोव्याचा संघ 77 धावांत गारद! महाराष्ट्राच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजी कोसळली

Vijay Merchant U16 Cricket Trophy: विजय मर्चंट करंडक १६ वर्षाखालील क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध गोव्याने रविवारी साफ नांगी टाकली.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijay Merchant U16 Cricket Trophy Goa Vs Maharashtra

पणजी: विजय मर्चंट करंडक १६ वर्षाखालील क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध गोव्याने रविवारी साफ नांगी टाकली. त्यांचा पहिला डाव अवघ्या ७७ धावांत गारद झाला. महाराष्ट्राच्या नील चंद्रात्रे याने अवघ्या २१ धावांत ७ गडी टिपले.

सूरत येथील विशाल क्रिकेट मैदानावर रविवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा नील गोव्याच्या फलंदाजांना भारी ठरला. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने गुंजन सावंत आणि प्रज्वल मोरे यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर २ बाद १४५ धावा करून ६८ धावांची आघाडी संपादली. गुंजन व प्रज्वल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. गुंजन याने ११४ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. दिवसअखेर ५९ धावांवर नाबाद असलेल्या प्रज्वल याने ११५ चेंडूंचा सामना करताना सात चौकार लगावले.

सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा हा निर्णय पूर्णतः उलटला. २ बाद ३४ धावावरून गोव्याने बाकी सर्व फलंदाज ठराविक अंतराने गमावले. पुदुचेरीविरुद्ध मागील लढतीत शतक केलेल्या आफ्रिद साब याने सर्वाधिक २९ धावा करताना ६० चेंडूत पाच चौकार मारले, तर सलामीच्या सर्वांभ नाईक याने ११५ चेंडूंचा सामना करताना दोन चौकारांसह १३ धावा केल्या. गोव्याच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ४७.२ षटकांत सर्वबाद ७७ (सर्वांभ नाईक १३, साईराज गोवेकर ३, शौनक तेली ०, आफ्रिद साब २९, मोहित यादव ०, साई नाईक ८, शमिक कामत ९, विनीत कामत ०, स्वराज फडते ०, संचित नाईक ६, राज बांदेकर नाबाद १, प्रणव शिंदे १३.२-८-२६-२, नील चंद्रात्रे ८-२-२१-७). महाराष्ट्र, पहिला डाव ः ४४ षटकांत २ बाद १४५ (एकनाथ देवाडे ११, गुंजन सावंत ६१, प्रज्वल मोरे नाबाद ५९, शमिक कामत ४-०-१७-०, मोहित यादव ११-१-५७-०, संचित नाईक १९-८-३०-१, आफ्रिद साब ९-१-२७-१, शौनक तेली १-०-८-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT