Vijay Hazare Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

Vijay Hazare Trophy 2025: मुंबईने आपली विजयी घोडदौड कायम राखताना आज झालेल्या सामन्यात गोवा संघाचा ८७ धावांनी पराभव केला आणि सलग चौथा विजय मिळवला.

गोमंतक ऑनलाईन टीम

जयपूर: विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईने आपली विजयी घोडदौड कायम राखताना आज झालेल्या सामन्यात गोवा संघाचा ८७ धावांनी पराभव केला आणि सलग चौथा विजय मिळवला.

मुंबईने प्रथम फलंदाजीत ५० षटकांत ४४४ धावांचा मोठा डोंगर उभा केला; परंतु गोवा संघानेही प्रतिकार करून नऊ बाद ३५७ धावांपर्यंत मजल मारली.

मुंबईकडून सर्फराझ खानने तुफानी दीडशतकी खेळी केली. ७५ चेंडूंत १५७ धावा करताना त्याने तब्बल १४ षटकार मारले. याव्यतिरिक्त नऊ चौकारांचीही पेरणी केली. सर्फराझचा भाऊ मुशीर खानने ६० तर हार्दिक तामोरेने २८ चेंडूंतच ५३ धावांचा तडाखा दिला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४४५ धावांचे लक्ष्य पार झालेले नाही, तरीही गोवा संघाने चार बाद १२० अशी परिस्थिती झालेली असतानाही प्रतिकार सोडला नाही. मूळचा दिल्लीकर असलेल्या या गोवा संघातून खेळणाऱ्या ललित यादवने ६४ धावांची खेळी केली; परंतु लक्षवेधक प्रतिकार केला तो अभिनव तेजराणा याने. त्याने ७० चेंडूंतच १०० धावा फटकावल्या. ललित आणि अभिनव यांनी १०३ चेंडूंत ११७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार दीपराज गावकरने तर २८ चेंडूंत ७० धावांचा तडाखा दिला.

मुंबई कर्णधार शार्दुल ठाकूरने स्वतःसह सात गोलंदाज वापरले, यात यशस्वी जयस्वालला तीन षटके गोलंदाजी दिली आणि जयस्वालने त्यात ५२ धावा दिल्या असल्या तरी दोन विकेट मिळवल्या. अभिनव आणि दीपराज या दोघांना त्याने बाद केले.

संक्षिप्त धावफलक : मुंबई ः ५० षटकांत ८ बाद ४४४ (यशस्वी जयस्वाल ४६- ६४ चेंडू, ६ चौकार, मुशीर खान ६०-६६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, सर्फराझ खान १५७- ७५ चेंडू, ९ चौकार, १४ षटकार, शार्दुल ठाकूर २७, हार्दिक तामोरे ५३- २८ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, शम्स मुलानी २२, तनुष कोटियन नाबाद २३, अर्जुन तेंडुलकर ८-०-७८-०, वासुकी कौशिक १०-२-६०-२, दीपराज गावकर ७-०-५७-१, शुभम तारी ७-०-५२-०, दर्शन मिसाळ ९-०-९८-३, ललित यादव ९-०-९३-२) वि. वि. गोवा ः ५० षटकांत ९ बाद ३५७ (अर्जुन तेंडुलकर २४, कश्यप बखले २१, स्नेहल कवठणकर २७, सुयश प्रभुदेसाई ३१, ललित यादव ६४- ६६ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, अभिनव तेजराणा १००- ७० चेंडू, ५ चौकार, ८ षटकार, दीपराज गावकर ७०- २८ चेंडू, ४ चौकार, ७ षटकार, राजशेखर हरिकांत ८, दर्शन मिसाळ १, वासुकी कौशिक नाबाद ०, शुभम तारी नाबाद ०, शार्दुल ठाकूर ६-०-२०-३, यशस्वी जयस्वाल ३-०-५२-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

VIDEO: कळंगुटमध्ये पर्यटकांपेक्षा तंबाखू-दारु पिऊन फिरणाऱ्यांचीच 'तोबा' गर्दी, सरत्या वर्षाला अशा प्रकारे निरोप; गर्दीचे विदारक वास्तव मांडणारा व्हिडिओ चर्चेत

New Year 2026: इंग्रजी वर्षाची सुरुवात सूर्यनमस्कार आणि योगाभ्यासाने! तांबडी सुर्ला महादेव मंदिरात शेकडो तरुणांचा उत्साह

पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

Goa Live News: मडकईत घराला भीषण आग; ८ ते १० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT