Vijay Hazare Trophy 2025 Dainik Gomatnak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy 2025: आधी 71 धावा, नंतर घेतले 5 बळी! गोव्याच्या कर्णधाराची कमाल; हिमाचलला नमवले, ललितचे झुंझार शतक

Goa vs Himachal Pradesh: फलंदाजी व गोलंदाजीत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविलेल्या दीपराज गावकर याने शुक्रवारी जयपूर येथे कमाल केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी ः फलंदाजी व गोलंदाजीत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविलेल्या दीपराज गावकर याने शुक्रवारी जयपूर येथे कमाल केली. अगोदर ७१ धावा आणि नंतर ५० धावांत ५ गडी टिपलेल्या कर्णधाराने गोव्याला विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

जयपूर येथील जयपुरिया विद्यालय मैदानावर झालेल्या एलिट ‘क’ गट सामन्यात गोव्याने हिमाचल प्रदेशवर आठ धावा व अखेरचे तीन चेंडू राखून मात केली. अगोदरच्या लढतीत गोव्याने छत्तीसगडला सहा विकेट राखून हरविले होते. गोव्याच्या विजयात पाहुणा क्रिकेटपटू ललित यादव (१०४) याचे कारकिर्दीतील पहिले लिस्ट ए शतकही निर्णायक ठरले, तसेच सुयश प्रभुदेसाई (५१) यानेही अर्धशतक केले.

त्या बळावर गोव्याने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर ९ बाद २८५ धावा केल्या. हिमाचल प्रदेशचा डाव ४९.३ षटकांत २७७ धावांत आटोपला. अवघा दुसराच लिस्ट ए सामना खेळणारा मूळ पंजाबचा पुखराज मानने झुंझार शतकी (१२६) खेळी केली; पण हिमाचल प्रदेशसाठी ती खेळी सार्थकी ठरली नाही. त्याने ११० चेंडूंतील खेळीत १४ चौकार व तीन षटकार मारले.

पुखराज याला दीपराज गावकर याने शुभम देसाई याच्याकरवी ४६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद केले. हिमाचल प्रदेशची ही आठवी विकेट ठरली. त्यानंतर २४ चेंडूंत ३४ धावा नोंदविणे बाकी फलंदाजांना जमले नाही आणि गोव्याच्या संघर्षमय विजयावर शिक्कामोर्तब झाले. गोलंदाजांनी २०.३ षटकांत हिमाचल प्रदेशची ५ बाद ११० अशी बिकट स्थिती केली होती, तेव्हा गोव्याचा विजय निश्चित मानला जात होता.

मात्र, २४ वर्षीय डावखुऱ्या पुखराजने जबरदस्त जिगर प्रदर्शित करताना किल्ला लढविला. त्याने नितीन शर्मा (३१) याच्यासमवेत ७५ धावांची भागीदारी केली. दीपराजने नितीनला त्रिफळाचीत बाद करून मोठा अडथळा दूर केला; पण पुखराजने लढणे कायम ठेवल्यामुळे गोव्यावरील दबाव वाढत गेला. अखेरच्या षटकात हिमाचलला ११ धावांची गरज होती. वासुकी कौशिकने तिसऱ्या चेंडूवर अखेरची विकेट घेत गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ५० षटकांत ९ बाद २८५ (सुयश प्रभुदेसाई ५१, ललित यादव १०४, दीपराज गावकर ७१, राजशेखर हरिकांत १६, रोहित कुमार १०-०-५५-५, मृदुल सुरोच १०-०-५०-२) वि. वि. हिमाचल प्रदेश ः ४९.३ षटकांत सर्वबाद २७७ (अंकित कलसी ३४, पुखराज मान १२६, नितीन शर्मा ३१, वासुकी कौशिक ९.३-१-३४-२, दीपराज गावकर १०-०-५०-५, शुभम देसाई ८-०-४७-१, दर्शन मिसाळ ६-०-४१-१, ललित यादव १०-०-४३-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: पाणी जपून वापरा; पर्वरीत दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Mandrem: मांद्रेतील जमिनी विकू देणार नाही! सरपंच फर्नांडिस यांचा निर्धार; भूमिपुत्रांसाठी जागा सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

Goa Congress: जि.पं., विद्यापीठ निवडणुकांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी! LOP आलेमाव य़ांचे प्रतिपादन; विजयी उमेदवारांचा मडगावात गौरव

Rohit Sharma: "रोहित को बोलिंग दो"! शून्यावर आउट गेला तरी 'हिटमॅन'ची क्रेझ कायम; प्रेक्षकांनी केली गोलंदाजी देण्याची मागणी

अग्रलेख: दिल्लीश्‍वरांचरणी केवळ गोवाच नव्हे तर गोंयकारपणही विक्रीस काढलेल्यांकडून अपेक्षा तरी किती आणि का ठेवायच्या?

SCROLL FOR NEXT