Vijay Hazare Trophy: स्नेहलच्या शतकामुळे गोव्याचा विजय, छत्तीसगडला सहा विकेट राखून सहज नमविले

Vijay Hazare Trophy 2025: स्नेहल कवठणकर याचे नाबाद शतक, तसेच त्याने केलेल्या दोन महत्त्वपूर्ण भागीदारींमुळे गोव्याने विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेस दणकेबाज विजयासह सुरवात केली.
Vijay Hazare Trophy
Vijay Hazare TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याचे नाबाद शतक, तसेच त्याने केलेल्या दोन महत्त्वपूर्ण भागीदारींमुळे गोव्याने विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेस दणकेबाज विजयासह सुरवात केली. जयपूर येथे बुधवारी झालेल्या एलिट क गट सामन्यात त्यांनी छत्तीसगडला सहा विकेट आणि ३५ चेंडू राखून सहज नमविले.

गोव्यासमोर विजयासाठी २३४ धावांचे लक्ष्य होते, त्यांनी ते ४४.१ षटकांत ४ विकेट गमावून गाठले. स्नेहल १०७ धावांवर नाबाद राहिला. त्याने ११६ चेंडूंचा सामना करताना दहा चौकार व एक षटकार मारला. त्याने कश्यप बखले (४८, ६८ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) याच्यासमवेत गोव्याला २०.५ षटकांत १०१ धावांची दमदार सलामी दिली. नंतर २९ धावांत ३ विकेट गमावल्यामुळे गोव्याची ३ बाद १३० अशी स्थिती झाली.

Vijay Hazare Trophy
Goa Cristmas Celebration: नाताळनिमित्त राजधानीत विद्युत रोशणाई, चर्चस्क्वेअर परिसर सजला; राज्यात उत्साहाचे वातावरण

स्नेहलने ललित यादव (४३, ४७ चेंडू, ५ चौकार) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करून गोव्याचा विजय पक्का केला. विजयासाठी ३१ धावा हव्या असताना ललित बाद झाल्यानंतर स्नेहलने कर्णधार दीपराज गावकर (नाबाद ११) याच्यासमवेत गोव्याला शानदार विजय मिळवून दिला. गोव्याकडून अभिनव तेजराणा व समीत मिश्रा यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Vijay Hazare Trophy
Goa Nightclub Fire: अजय गुप्ताला पाच दिवसांची पोलिस कोठडी, रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

त्यापूर्वी, कर्णधार दीपराज गावकर (४-३५) व वासुकी कौशिक (४-४०) यांच्या शानदार नियंत्रित ‘जलदगती’ गोलंदाजीमुळे गोव्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी छत्तीसगडला २३३ धावांत गुंडाळले. पदार्पण करणारा मयंक वर्मा (६४) व कर्णधार अमनदीप खरे (७६) यांनी चौथ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केल्यामुळे छत्तीसगडचा डाव सावरला गेला, पण अखेरच्या सात विकेट ५५ धावांत गमावल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही. दीपराजने लिस्ट ए क्रिकेटमधील गोलंदाजीतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदविली.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड ः ४८.५ षटकांत सर्वबाद २३३ (अनुज तिवारी २९, मयंक वर्मा ६४, अमनदीप खरे ७६, शुभम अगरवाल नाबाद १९, वासुकी कौशिक ९.५-०-४०-४, समीत मिश्रा ९-१-४२-१, दीपराज गावकर १०-०-३५-४, ललित यादव ६-०-३९-०, दर्शन मिसाळ ८-०-३९-१, विकास सिंग ६-०-३६-०) पराभूत वि. गोवा ः ४४.१ षटकांत ४ बाद २३४ (स्नेहल कवठणकर नाबाद १०७, कश्यप बखले ४८, अभिनव तेजराणा १३, सुयश प्रभुदेसाई २, ललित यादव ४३, दीपराज गावकर नाबाद ११, शुभम अगरवाल ३-७३).

Vijay Hazare Trophy
Goa Cristmas Celebration: नाताळनिमित्त राजधानीत विद्युत रोशणाई, चर्चस्क्वेअर परिसर सजला; राज्यात उत्साहाचे वातावरण

स्नेहलने गाठले स्वप्नीलला!

लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेटमध्ये गोव्यातर्फे सर्वाधिक शतके नोंदविलेल्या स्वप्नील अस्नोडकर याला बुधवारी स्नेहल कवठणकर याने गाठले. ३० वर्षीय स्नेहलचे हे ५५ सामन्यांतील पाचवे शतक ठरले.

स्वप्नीलनेही गोव्याकडून खेळताना ७५ सामन्यांत पाच शतके केली आहे. स्वप्नीलची एकूण सहा एकदिवसीय शतके आहेत, एक शतक देवधर करंडक स्पर्धेत खेळताना दक्षिण विभागातर्फे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com