Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy Semifinal: सेमीफायनलसाठी 4 संघ निश्चित! कोण-कोणाशी अन् कधी भिडणार? जाणून घ्या सर्वकाही

Vijay Hazare Trophy 2024-25 विदर्भाने राजस्थानला 9 विकेट्सने हरवून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले तर हरियाणाने गुजरात संघाला 2 विकेट्सने पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Manish Jadhav

Vijay Hazare Trophy 2024-25 Semifinal: विजय हजारे ट्रॉफी 2024-24 चा संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आता हरियाणा, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्र या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विदर्भाने राजस्थानला 9 विकेट्सने हरवून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले तर हरियाणाने गुजरात संघाला 2 विकेट्सने पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, पहिला उपांत्य सामना 15 जानेवारी रोजी हरियाणा (Haryana) आणि कर्नाटक यांच्यात खेळला जाईल. दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात खेळला जाईल. दोन्ही उपांत्य सामने वडोदरा मैदानावर होतील. चारपैकी जो संघ उपांत्य सामना जिंकेल तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना 18 जानेवारी रोजी वडोदरा मैदानावर खेळवला जाईल.

विजय हजारे ट्रॉफीचे वेळापत्रक

हरियाणा विरुद्ध कर्नाटक - 15 जानेवारी

विदर्भ विरुद्ध महाराष्ट्र - 16 जानेवारी

अंतिम सामना - 18 जानेवारी

विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांचे कर्णधार:

टीम- कर्णधार

हरियाणा- अंकित कुमार

विदर्भ- करुण नायर

महाराष्ट्र- ऋतुराज गायकवाड

कर्नाटक- मयंक अग्रवाल

हरियाणा उपांत्य फेरीत पोहोचला

गुजरातविरुद्ध (Gujarat) विजयासाठी ठेवलेले 197 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हरियाणाला खूप संघर्ष करावा लागला. गुजरातकडून हेमांग पटेलने सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. त्याने 62 चेंडूंच्या खेळीत दोन चौकार आणि पाच षटकार मारले. लक्ष्याचा पाठलाग करताना हिमांशू राणाने 89 चेंडूत 66 धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. 35व्या आणि 43 व्या षटकात 20 धावांत चार विकेट गमावल्यानंतर संघ अडचणीत आला होता पण कंबोज (नाबाद सात)ने 44व्या षटकात षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला. रवी बिश्नोईच्या (46 धावांत चार बळी) शानदार गोलंदाजीमुळे हरियाणाचा संघ संघर्ष करताना दिसला.

अक्षर पटेल अपयशी ठरला

त्याआधी, अनुज ठुकराल (39 धावांत तीन बळी), निशांत सिंधू (40 धावांत तीन बळी) आणि अंशुल कंबोज (36 धावांत दोन बळी) यांनी नियमित अंतराने बळी घेत गुजरातच्या फलंदाजांना रोखले. गुजरातकडून कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. केवळ हेमांग पटेलला अर्धशतक झळकावता आले. तथापि, इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करणारा अक्षर पटेल या सामन्यात गुजरातसाठी फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने केवळ तीन धावा केल्या, परंतु एकही विकेट मिळवू शकला नाही. त्याने 10 षटकांत 41 धावा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT