Sameer Amunekar
विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये राजस्थान आणि तामिळनाडू यांच्यात झालेल्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यादरम्यान नारायण जगदीशन दमदार फलंदाजी केली.
उजव्या हाताच्या या सलामीवीरानं एकाच षटकात सलग 6 चौकार मारले. जगदीशननं राजस्थानचा सलामीचा गोलंदाज अमन शेखावतच्या षटकात ही कामगिरी केली.
अमन शेखावतनं त्याच्या एका षटकात 7 चौकारांसह त्यानं एकूण 29 धावा दिल्या. त्याचा पहिलाच चेंडू वाईड झाला, ज्यावर चौकार गेला.
अमन शेखावतनं सतत शॉर्ट बॉल टाकले आणि जगदीशननं ऑफ साईडच्या बाहेर कट करुन आणि ऑन साईडवर पुल शॉट खेळून सलग 6 चेंडूत 6 चौकार मारले.
या सामन्यात राजस्थानने 47.3 षटकात सर्व गडी गमवून 267 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूने आक्रमक सुरुवात केली.
तामिळनाडूचा संपूर्ण संघ 47.1 षटकात 248 धावा करून बाद झाला. हा सामना राजस्थानने 19 धावांनी नावावर केला. मात्र सामना गमावल्यानंतरही तामिळनाडूच्या जगदिसन याचं कौतुक होत आहे.