1919 Sports Cricket Ground Goa, Suryakumar Yadav In Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा कर्णधार गोव्यात! 'मिस्टर 360'च्या हस्ते होणार भव्य क्रिकेट मैदानाचं उद्घाटन; CM सावंतांची उपस्थिती

1919 Sports Cricket Ground Goa: भव्य स्वरुपातील पाच हजार आसनक्षमतेचे ‘१९१९ स्पोर्टस’ क्रिकेट मैदान वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात साकारले आहे.

Sameer Panditrao

वास्को: मुरगावमधील चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांची निर्मिती असलेले भव्य स्वरुपातील पाच हजार आसनक्षमतेचे ‘१९१९ स्पोर्टस’ क्रिकेट मैदान वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात साकारले आहे.

या मैदानाचे ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भारताच्या टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत लोकार्पण होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत कमलाप्रसाद यांनी दिली.

कमलाप्रसाद यांनी सांगितले, की ‘‘वेर्णा औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान साकरले आहे. ७९ यार्ड जागेत या मैदानाचे बांधकाम करण्यात आले आहे. मैदानावर एकूण नऊ खेळपट्ट्या आहेत, तसेच दिन-रात्र सामने खेळविण्यासाठी प्रकाशझोत व्यवस्थाही आहे.

मैदानाची आसनक्षमता पाच हजारापेक्षा जास्त असून भविष्यात तीस हजार आसनक्षमता करण्याचे नियोजन आहे. मैदानास जोडून क्रिकेट अकादमी तयार करण्याचे प्रयत्न आहेत. बाजूला इनडोअर मैदानाचा काम सुरू असून या ठिकाणी पावसाळ्यात क्रिकेटपटू सराव करू शकतील.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ योजनेमुळे आपल्याला मैदान उभारणीची प्रेरणा मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

उदयोन्मुख मुलींना मोफत प्रशिक्षण

कमलाप्रसाद यांची दोन्ही मुलं क्रिकेटपटू असून गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. मुलगा वीर यादव गोव्याच्या १४, १६, १९ व २३ वर्षांखालील संघातून खेळला आहे. मुलगी हर्षिता यादव गोव्याच्या सीनियर महिला संघातील नियमित अष्टपैलू असून ती सुद्धा १५, १९, २३ वर्षांखालील संघातून खेळली आहे.

वयोगट पातळीवर हर्षिता हिने गोव्याचे नेतृत्वही केले आहे. ‘‘राज्यातील युवा क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी क्रिकेट अकादमीची संकल्पना आहे. काही खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांना अकादमीतील प्रशिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. गोव्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटू मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जाईल’’ असे कमलाप्रसाद यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT