Rohan Gawas Desai
Rohan Gawas DesaiDainik Gomantak

GCA: पुन्हा गोंधळ!'रोहन' यांच्या BCCI प्रतिनिधित्वाला आव्हान; विपुल फडके यांनी दाखल केली याचिका

Rohan Gawas Desai: बीसीसीआय आगामी निवडणुकीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचा (जीसीए) प्रतिनिधी म्हणून रोहन देसाई यांच्या नावावर बीसीसीआय निवडणूक अधिकारी ए. के. जोती यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
Published on

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आगामी निवडणुकीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचा (जीसीए) प्रतिनिधी म्हणून रोहन गावस देसाई यांच्या नावावर बीसीसीआय निवडणूक अधिकारी ए. के. जोती यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. आता शनिवारी जीसीए आणि संघटनेचे मावळते अध्यक्ष विपुल फडके यांनी या निर्णयास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली.

बीसीसीआय निवडणूक येत्या २८ सप्टेंबर रोजी नियोजित आहे. त्यानिमित्त उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया शनिवारी सुरू झाली. रविवारपर्यंत (ता. २१) अर्ज दाखल करता येईल. रोहन गावस देसाई सध्या बीसीसीआयचे संयुक्त सचिव आहेत.

Rohan Gawas Desai
BCCI: रोहन यांच्या प्रतिनिधित्वावर शिक्कामोर्तब! संयुक्त सचिवास दिलासा; अंतिम मतदार यादीत समावेश

प्राप्त माहितीनुसार, ते पुन्हा बीसीसीआय निवडणूक लढविण्याचे संकेत आहेत. त्यानिमित्त रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असे सूत्राने सांगितले. रोहन यांच्या जीसीए प्रतिनिधी नियुक्तीला विपुल यांनी बीसीसीआय निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे गेल्या रविवारी (ता. १४) अधिकृत आक्षेप नोंदविला होता.

Rohan Gawas Desai
BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

या आक्षेपाची शुक्रवारी (ता. १९) पडताळणी झाली, त्यानंतर निवडणूक अधिकारी ए.के. जोती यांनी बीसीसीआयची अंतिम निवडणूक मतदार यादी घोषित केली. जीसीए नियुक्त प्रतिनिधी या नात्याने रोहन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, सोमवारी याचिका न्यायालयात मांडली जाण्याआधी काही घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कायदेविषयक मत घेतले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com