Goa Kabaddi Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Kabaddi Championship: राष्ट्रीय कबड्डीत गोव्याची घोडदौड; दोन्ही संघ खेलो इंडिया, ज्युनियर फेडरेशन कपसाठी पात्र

Goa Kabaddi Team: ५०व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या मुला व मुलींच्या संघाने घोडदौड राखनाताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Sameer Amunekar

Junior National Kabaddi Championship

पणजी : उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेल्या ५०व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या मुला व मुलींच्या संघाने घोडदौड राखनाताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुलींच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत पंजाबला ४३-२६ गुणफरकाने हरविले. मुलांच्या संघाने ड गट साखळीत अव्वल स्थान मिळविताना अखेरच्या लढतीत तमिळनाडूस ४५-२८ असे पराजित केले, नंतर उपउपांत्यपूर्व लढतीत त्यांनी कर्नाटकला ५३-२४ गुणफरकाने हरविले.

राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे गोव्याचे दोन्ही संघ आता खेलो इंडिया, तसेच ज्युनियर फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

उपांत्यपूर्व फेरीत मुलांचा संघ उत्तराखंडविरुद्ध, तर मुलींचा संघ महाराष्ट्राविरुद्ध खेळेल. स्पर्धेत गोव्याच्या दोन्ही संघांनी साखळी फेरीत शानदार खेळ केला, तर बाद फेरीतही त्याच खेळाची मालिका कायम राखली आहे. गतवर्षी राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत गोव्याच्या दोन्ही संघांना ब्राँझपदक मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात कोकणवासीयांची कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे त्रस्त

Chandra Grahan 2025: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण! दिसणार 'ब्लड मून'चा थरार; जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

त्यावेळी कोळसा प्रदूषणात वाढ होणार हे माहीत नव्हते का? रेल्वे दुपदरीकरणाचा DPR काँग्रेसच्या काळात; ढवळीकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT