Sameer Panditrao
गोवा पक्षी महोत्सवाची ८वी आवृत्ती १७, १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी दक्षिण गोव्यातील खोतीगाव वन्यजीव अभयारण्यात आयोजित केली आहे.
स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक जैव आणि निसर्गसंपदेच्या सौंदर्याचा आनंद घ्यायची ही संधी सर्व वयोगटांसाठी आहे.
खोतीगाव वन्यजीव अभयारण्यात वेगवेगळ्या पक्षी निरीक्षकांनी आतापर्यंत मिळून सुमारे २२१ विविध प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केलेली आहे.
गोव्याचा प्रदेश हा दोन वेगळ्या परिसंस्थांचा एक अनोखा संगम आहे- निळी सागरी संस्था आणि गर्द हिरवी जंगले.
जागतिक पातळीवर पक्षी पर्यटन हा एक भरभराटीचा उद्योग बनला आहे. पक्षीप्रेमी, छायाचित्रकार, ब्लॉगर्स, निसर्गप्रेमी यांच्यासाठी ही ठिकाणे पसंतीची असतात.
जैवविविधतेबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून वनविभाग त्या दिशेने प्रयत्न करत असते. खोतीगाव अभयारण्यात आयोजित होणारा ८वा पक्षी महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे.
ट्रिप किंवा कौटुंबिक सहल अशा माध्यमातून स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक जैव आणि निसर्गसंपदेच्या सौंदर्याचा आनंद घ्यायची ही संधी आहे.