Cricket|Clean Bowled Canva
गोंयचें खेळामळ

Women's T20 Cricket: तामिळनाडूनं गोव्याचा उडवला धुव्वा; महिला संघाचा सलग तिसरा पराभव; संजुला आणि श्रेयाची खेळी व्यर्थ!

Tamil Nadu beat Goa: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत ओळीने तीन सामने जिंकलेल्या गोव्याला शनिवारी सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.

Manish Jadhav

पणजी: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत ओळीने तीन सामने जिंकलेल्या गोव्याला शनिवारी सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यांना बडोदा येथे झालेल्या लढतीत तामिळनाडूकडून 15 धावांनी हार पत्करावी लागली. कर्णधार संजुला नाईक व श्रेया परब यांनी सात षटकांत 42 धावांची सलामी दिल्यानंतर गोव्याला 135 धावांचे आव्हान झेपले नाही.

संक्षिप्त धावफलक: तमिळनाडू: 20 षटकांत 4 बाद 134 (एल. नेत्रा 27, एम. डी. थिरुषकामिनी नाबाद 46, तरन्नुम पठाण 4-1-20-0, प्रीती यादव 4-0-22-1, पूर्वा भाईडकर 4-0-37-0, सुनंदा येत्रेकर 4-0-32-3, संजुला नाईक 1-0-8-0, श्रेया परब 3-0-15-0) वि. वि. गोवा: 20 षटकांत 9 बाद 119 (संजुला 18, श्रेया 33, पूर्वजा वेर्लेकर 19, तरन्नुम 5, प्रीती 18, तेजस्विनी दुर्गड 5, विनवी गुरव 4, पूर्वा 0, तनया नाईक 3, दिव्या नाईक नाबाद 8, सुनंदा नाबाद 0, एस. बी. कीर्तना 2-20, अर्षी चौधरी 3-25).

ओडिशा आणि आंध्रनं हारवलं

दरम्यान, गोव्याच्या संघाला गुरुवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ओडिशाने त्यांच्यावर 10 विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. जम्मू-काश्मीर, मिझोराम, मुंबई या संघांना नमवल्यानंतर गोव्याच्या महिला संघाला मागील लढतीत आंध्रकडून पराभव पत्करावा लागला होता.

ठराविक अंतराने विकेट्स पडल्या

दरम्यान, गोव्याने 11 धावांचे आव्हान दिल्यानंतर ओडिशाच्या सरिता मेहेर (59) व कर्णधार माधुरी मेहेता (49) या सलामीच्या जोडीने 16.3 षटकांतच विजयाला गवसणी घातली. त्यापूर्वी, गोव्याची कर्णधार संजुला नाईक (24) व पूर्वजा वेर्लेकर (22) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 45 धावांच्या भागीदारीनंतर ठराविक अंतराने विकेट गमावल्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तरन्नुम पठाण हिच्या नाबाद 37 धावांमुळे गोव्याला शतकी धावसंख्या उभारता आली, परंतु इतरांची साथ लाभली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT