Women's T20 Cricket: प्रीतीची झुंझार खेळी व्यर्थ! अपराजित गोव्याला आंध्रचा धक्का; 3 धावांनी पत्करावी लागली हार

Goa VS Andhra Pradesh: प्रीती यादव हिने झुंझार 49 धावांची खेळी केली, तरीही गोव्याला सीनियर महिला टी-20 क्रिकेट सामन्यात आंध्रविरुद्ध निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले.
Women's T20 Cricket: प्रीतीची झुंझार खेळी व्यर्थ! अपराजित गोव्याला आंध्रचा धक्का; 3 धावांनी पत्करावी लागली हार
prtitiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रीती यादव हिने झुंझार 49 धावांची खेळी केली, तरीही गोव्याला सीनियर महिला टी-20 क्रिकेट सामन्यात आंध्रविरुद्ध निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. सलग तीन सामने जिंकल्यानंतर त्यांना तीन धावांनी हार पत्करावी लागली. अ गट सामना मंगळवारी बडोदा येथे झाला. गोव्यासमोर विजयासाठी 129 धावांचे आव्हान होते. अखेरच्या षटकात गोव्याला अकरा धावांची आवश्यकता होती.

दरम्यान, या षटकातील पहिल्याच चेंडूंवर प्रीती धावबाद झाली आणि गोव्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दिव्या नाईक बाद झाली, तर पाचव्या चेंडूंवर चौकार मारलेली तनया नाईक शेवटच्या चेंडूवर बाद झाली आणि गोव्याचा (Goa) डाव 125 धावांत संपुष्टात आला. प्रीती हिने आक्रमक फलंदाजी करताना 34 चेंडूंत आठ चौकारांसह 49 धावा केल्या. तत्पूर्वी, सुनंदा येत्रेकर (3-23) व श्रेया परब (2-18) या गोव्याच्या गोलंदाजांनी आंध्रला 9 बाद 128 धावांत रोखले होते.

Women's T20 Cricket: प्रीतीची झुंझार खेळी व्यर्थ! अपराजित गोव्याला आंध्रचा धक्का; 3 धावांनी पत्करावी लागली हार
Goa Womens T20 Cricket: गोव्याच्या महिला संघाची धाकड कामगिरी; गुजरातला नमवत जिंकला टी-20 चा किताब

संक्षिप्त धावफलक

आंध्र: 20 षटकांत 9 बाद 128 (पी. रंगा लक्ष्मी 24, व्ही. स्नेहा दीप्ती 31, ए. अनुषा 22, के. ई. दयाना 12, एन. आर. श्रीचरणी 15, तरन्नुम पठाण 4-0-30-1, पूर्वा भाईडकर 4-0-32-0, प्रीती यादव 4-0-20-1, सुनंदा येत्रेकर 4-0-23-3, श्रेया परब 4-1-18-2) वि. वि. गोवा: 20 षटकांत सर्वबाद 125 (संजुला नाईक 23, श्रेया परब 8, पूर्वजा वेर्लेकर 8, प्रीती यादव 49, तरन्नुम पठाण 4, विनवी गुरव 0, पूर्वा भाईडकर 6, तेजस्विनी दुर्गड 2, सुनंदा येत्रेकर नाबाद 4, दिव्या नाईक 1, तनया नाईक 4, एन. आर. श्रीचरणी 4-0-18-2, वासावी अखिला पवनी 4-0-21-3, हेर्निएटा परेरा 2-0-10-3).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com