Arjun Tendulkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा जलवा! IPLसाठी ठोठावले दरवाजे; गोव्यासाठी सलामीला फलंदाजी; गोलंदाजीतही कमाल

Syed Mushtaq Ali Trophy 2025: गोव्याने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या. ललितने पाहुणा क्रिकेटपटू या जबाबदारीला न्याय देताना ४९ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ललित यादवची आक्रमक फलंदाजी, तसेच वासुकी कौशिक, अर्जुन तेंडुलकर, दर्शन मिसाळ यांचा प्रभावी मारा या बळावर सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने चंडीगडवर ५२ धावांनी अफलातून विजय नोंदविला. एलिट ब गट सामना शुक्रवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झाला.

प्रकाशझोतात झालेल्या या लढतीत चंडीगडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोव्याला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोव्याने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या. ललितने पाहुणा क्रिकेटपटू या जबाबदारीला न्याय देताना ४९ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या.

नंतर गोव्याने चंडीगडचा डाव १९ षटकांत १२१ धावांत गुंडाळला. कौशिक व अर्जुन यांनी चंडीगडची चौथ्याच षटकात ४ बाद १० धावा अशी अतिशय नाजूक स्थिती केली. या परिस्थितीतून चंडीगडला शेवटपर्यंत सावरता आले नाही. कौशिक व अर्जुन यांनी अनुक्रमे १२ व १७ धावांत प्रत्येकी तीन, तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन यानेही तिघा फलंदाजांना बाद केले. गोव्याचा हा दोन लढतीतील पहिला विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करताना एकवेळ गोव्याची सहाव्या षटकात ४ बाद ३५ अशी नाजूक स्थिती होती, कर्णधार सुयश प्रभुदेसाईचा खराब फॉर्म कायम राहिला. पहिल्याच चेंडूवर लेगस्टंपबाहेरील चेंडूवर त्याने यष्टिरक्षकाकडे झेल दिला. नंतर ललितने संघाला सावरताना चंडीगडवर प्रतिहल्ला चढविला. त्याने दीपराज गावकर (२८) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ५० धावांची, तर नंतर सातव्या विकेटसाठी विकास सिंग (८) याच्यासह ५४ धावांची अभेद्य भागीदारी ३.४ षटकांतच केली.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ६ बाद १७३ (ईशान गडेकर १३, अर्जुन तेंडुलकर १४, ललित यादव नाबाद ८२, दीपराज गावकर २८, दर्शन मिसाळ १८, विकास सिंग नाबाद ८, संदीप शर्मा ४-०-३९-२, जगजित सिंग ४-०-३३-२) वि. वि. चंडीगड : १९ षटकांत सर्वबाद १२१ (चिरागवीर धिंडसा १९, राजअंगद बावा २९, जगजित सिंग २०, वासुकी कौशिक ४-१-१२-३, अर्जुन तेंडुलकर ४-०-१७-३, दर्शन मिसाळ ४-०-२३-३, दीपराज गावकर ४-०-२३-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT