Suyash Prabhudesai Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy 2025: गोव्याने घेतला बदला! मध्य प्रदेशला नमविले; सुयश, अभिनवची अर्धशतके; तेंडुलकरला 3 बळी

Goa VS Madhya Pradesh: रणजी करंडक क्रिकेटमध्ये गतमहिन्यात मध्य प्रदेशने गोव्याच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला होता, त्याचा बदला मंगळवारी कोलकाता येथे घेण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रणजी करंडक क्रिकेटमध्ये गतमहिन्यात मध्य प्रदेशने गोव्याच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला होता, त्याचा बदला मंगळवारी कोलकाता येथे घेण्यात आला. याकामी कर्णधार सुयश प्रभुदेसाई (नाबाद ७५) व अभिनव तेजराणा (५५) यांची अर्धशतके निर्णायक ठरली.

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील एलिट ब गट सामन्यात गोव्याने दणकेबाज खेळ करताना मध्य प्रदेशला सात विकेट आणि नऊ चेंडू राखून आरामात हरविले. सामना सॉल्ट लेक-कोलकाता येथील जेयू सेकंड कँपस मैदानावर झाला. गोव्याचा हा चार सामन्यांतील दुसरा विजय असून त्यांचे आठ गुण झाले आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे मध्य प्रदेशचे आठ गुण कायम राहिले.

गोव्यासमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य होते. तीन षटकांत दोन्ही सलामी फलंदाजांना गमावल्यानंतर अभिनव व सुयश यांनी संयम आणि आक्रमकतेचा सुरेख संगम साधत गोव्याला मजबूत स्थिती गाठून दिली. विजयासाठी ३६ चेंडूंत ५७ धावांची गरज असताना अभिनव बाद झाल्यामुळे तिसऱ्या विकेटची ८९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. डावखुऱ्या फलंदाजाने ३३ चेंडूंचा सामना करताना तीन चौकार व चार षटकार मारले.

नंतर सुयशने ललित यादव (नाबाद १२) याच्या साथीत १.३ षटके बाकी राखून गोव्याला विजय मिळवून दिले. कर्णधारास साजेशी खेळी करताना सुयशने ५० चेंडूंत सहा चौकार व तीन षटकार मारले. तोच सामन्याचा मानकरी ठरला. त्यापूर्वी, गोव्याने नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.

हरप्रीतसिंग भाटिया याच्या आक्रमक नाबाद ८० धावांमुळे चौथ्या षटकातील ३ बाद १० अशा स्थितीतून मध्य प्रदेशने ६ बाद १७० धावांची मजल मारली. हरप्रीतने कर्णधार रजत पाटीदार (२९) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. डावाच्या अंतिम टप्प्यात अनिकेत वर्मा याने एक चौकार व चार षटकारांसह १३ चेंडूंत केलेल्या आक्रमक ३४ धावा मध्य प्रदेशसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. हरप्रीतने ५२ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व दोन षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश : २० षटकांत ६ बाद १७० (हरप्रीतसिंग भाटिया नाबाद ८०, रजत पाटीदार २९, अनिकेत वर्मा ३४, अर्जुन तेंडुलकर ४-०-३६-३, वासुकी कौशिक ४-०-२२-१, हेरंब परब ३-०-२७-२, दीपराज गावकर ४-०-३०-०, दर्शन मिसाळ २-०-२३-०, ललित यादव ३-०-२४-०) पराभूत वि. गोवा : १८.३ षटकांत ३ बाद १७१ (ईशान गडेकर ५, अर्जुन तेंडुलकर १६, अभिनव तेजराणा ५५, सुयश प्रभुदेसाई नाबाद ७५, ललित यादव नाबाद १२, त्रिपुरेश सिंग ३-०-२७-१, व्यंकटेश अय्यर ३-०-३५-१, राहुल बाथम ३.३-०-३४-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात 'दीपवीर'चा शाही अंदाज! चुलत भावाच्या लग्नाला लावली हजेरी, सून दीपिकाने पार पाडल्या जबाबदाऱ्या; Video Viral

Vasco Traffic Diversion: 6 महिने वाहतूक वळवण्यास आमचा विरोधच! दाबोळी उड्डाण पुल बांधकाम, वास्कोतील डायव्हर्जनला नागरिकांचा नकार

Nandi Darshan: 'पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों'! पर्तगाळ येथे नांदी दर्शन; 575 कलाकारांनी उलगडला सांस्कृतिक ठेवा

Goa Cyber Crime: काळजी घ्या! गोव्यात महिन्‍याला 5 सायबर गुन्हे, 267 गुन्‍ह्यांची नोंद; गृहमंत्रालयाची आकडेवारी उघड

Goa Live News: कुटुंबासोबत सुट्टीवर आलेल्या पर्यटकाचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

SCROLL FOR NEXT