Syed Mushtaq Ali Trophy 2025: गोव्याच्या गोलंदाजांची धुलाई, हैदराबादचा 7 विकेट, 6 षटके राखून विजय; ललितचे अर्धशतक व्यर्थ

Hyderabad vs Goa T20: यष्टिरक्षक-फलंदाज प्रज्ञय रेड्डी जास्तच आक्रमक होता. त्याने ६७ धावांच्या नाबाद खेळीत ३४ चेंडूंचा सामना करताना चार चौकार व पाच षटकार खेचले.
 Hyderabad vs Goa T20
Hyderabad vs Goa T20Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हैदराबादच्या फलंदाजांनी रविवारी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट सामन्यात गोव्याच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना १६१ धावांचे विजयी लक्ष्य सात विकेट आणि सहा षटके राखून सहज गाठले. एलिट ब गट सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर झाला.

हैदराबादच्या तिघा फलंदाजांनी मिळून ११ षटकार मारले. यष्टिरक्षक-फलंदाज प्रज्ञय रेड्डी जास्तच आक्रमक होता. त्याने ६७ धावांच्या नाबाद खेळीत ३४ चेंडूंचा सामना करताना चार चौकार व पाच षटकार खेचले. त्यामुळे हैदराबादने १४ षटकांतच ३ बाद १६६ धावा करून सामना जिंकला. प्रज्ञय याने अमन राव (४०, २२ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.

हैदराबादचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता तीन सामन्यांतून आठ गुण झाले आहेत. स्पर्धेतील एक विजय व दोन पराभव अशी कामगिरी असलेल्या गोव्याचे चार गुण कायम राहिले. हैदराबादने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोव्याचा डाव बाराव्या षटकात संथ फलंदाजीसह ४ बाद ६७ असा गडगडला होता.

 Hyderabad vs Goa T20
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा जलवा! IPLसाठी ठोठावले दरवाजे; गोव्यासाठी सलामीला फलंदाजी; गोलंदाजीतही कमाल

सलग दुसऱ्या डावात झुंझार आणि आक्रमक फलंदाजी केलेल्या ललित यादव याच्यामुळे गोव्याला ४ बाद १६० अशी काहीप्रमाणात आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. ललित ८५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना १० चौकार व तीन षटकार मारले. त्याने दर्शन मिसाळ (नाबाद १८) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची अभेद्य भागीदारी केली. ललितने मागील लढतीत चंडीगडविरुद्धही निर्णायक नाबाद ८२ धावांची खेळी केली होती.

 Hyderabad vs Goa T20
Syed Mushtaq Ali Trophy: अभिनवचा धडाका, पण गोवा पराभूत; टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशचा सहा विकेटने विजय

संक्षिप्त धावफलक

गोवा ः २० षटकांत ४ बाद १६० (अर्जुन तेंडुलकर ७, ईशान गडेकर १, अभिनव तेजराणा २१, दीपराज गावकर २३, ललित यादव नाबाद ८५, दर्शन मिसाळ नाबाद १८, तनय त्यागराजन ४-०-२०-२) पराभूत वि. हैदराबाद ः १४ षटकांत ३ बाद १६६ (तन्मय अगरवाल १९, अमन राव ४०, प्रज्ञय रेड्डी नाबाद ६७, राहुल बुद्धी १८, वासुकी कौशिक २-०-३०-०, अर्जुन तेंडुलकर २-०-१३-०, दीपराज गावकर २-०-२६-१, मोहित रेडकर १-०-२९-०, दर्शन मिसाळ ४-०-४१-१, विकास सिंग ३-०-२२-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com