Arjun Tendulkar, Suyash Prabhudesai Dainik Gomanak
गोंयचें खेळामळ

IPL 2025 Mega Auction: गोव्याचे सुयश,अर्जुन आयपीएल मेगा लिलावात; एकूण 574 खेळाडू पात्र

Goa Cricket: गोव्याचा हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई, तसेच सलग तीन मोसम राज्याकडून रणजी क्रिकेट खेळणारा डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकर यांचा आगामी आयपीएल २०२५ मेगा लिलावासाठी खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

IPL 2025 Mega Auction Suyash Prabhudessai Arjun Tendulkar

पणजी: गोव्याचा हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई, तसेच सलग तीन मोसम राज्याकडून रणजी क्रिकेट खेळणारा डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकर यांचा आगामी आयपीएल २०२५ मेगा लिलावासाठी खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

आयपीएलतर्फे लिलावासाठी पात्र ५७४ खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. सौदी अरेबियातील जेद्दा येथे होणाऱ्या मेगा लिलावासाठी ३६६ भारतीय, तर २०८ परदेशी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लिलावात एकूण २०४ जागा उपलब्ध आहेत. सुयश व अर्जुन या दोघांचीही मूळ रक्कम ३० लाख रुपये आहे.

सुयश यापूर्वी २०२२-२०२४ या कालावधीत आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सदस्य होता. त्याला निवडक संधी मिळाली. तीन वर्षांच्या कालावधीत तो ११ आयपीएल सामने खेळला व १२६ धावा केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये २६ वर्षीय सुयश गोव्याचा प्रमुख फलंदाज आहे. ३७ रणजी सामन्यांत त्याने सहा शतके व १४ अर्धशतकांसह २५८१ धावा केल्या असून यंदा प्लेट विभागात खेळताना त्याने एक शतक व दोन अर्धशतकांसह तीन सामन्यांत २४७ धावा केल्या आहेत.

गोव्यातर्फे पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने २०२२ मध्ये रणजी करंडक पदार्पण केल्यापासून अर्जुन याने १७ रणजी सामन्यांत ३७ गडी बाद केले. गुरुवारी पर्वरी येथे गोव्याने रणजी क्रिकेट स्पर्धेतील विक्रमी विजयाची नोंद केली.

अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या त्या सामन्यात अर्जुनने कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रथम श्रेणी कामगिरी नोंदविताना पहिल्या डावात २५ धावांत ५ गडी बाद केले होते. यंदा त्याने चार सामन्यांत १६ गडी बाद केले आहेत. आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन २०२१ पासून मुंबई इंडियन्सशी नोंदणीकृत असून स्पर्धेत तो २०२३ व २०२४ मध्ये खेळला. पाच आयपीएल सामन्यांत त्याने तीन गडी बाद केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT