FC Goa Coach Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

FC Goa: गतमोसमात (२०२४-२५) ओडिशातील भुवनेश्‍वर येथे सुपर लीग स्पर्धेतील अंतिम लढतीत एफसी गोवाने जमशेदपूर एफसीला ३-० फरकाने नमवून विजेतेपद पटकावले होते.

Sameer Panditrao

पणजी: एफसी गोवासमोर यावेळेस सुपर कप विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल. त्यांच्या गटात गतउपविजेता जमशेदपूर एफसी, ड्युरँड कप विजेता नॉर्थईस्ट युनायटेड, आय-लीग विजेता इंटर काशी आदी मातब्बर संघ आहेत.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गुरुवारी स्पर्धेची गटवारी जाहीर केली. स्पर्धा येत्या २५ ऑक्टोबरपासून गोव्यात नियोजित असून सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम व बांबोळी ॲथलेटिक्स स्टेडियमवर होतील. स्पर्धेत १६ संघांचा समावेश असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील १२, तर आय-लीग स्पर्धेतील चार संघ स्पर्धेत खेळतील.

गतमोसमात (२०२४-२५) ओडिशातील भुवनेश्‍वर येथे सुपर लीग स्पर्धेतील अंतिम लढतीत एफसी गोवाने जमशेदपूर एफसीला ३-० फरकाने नमवून विजेतेपद पटकावले होते, तसेच एएफसी चँपियन्स लीग दोन फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता मिळविली होती. एआयएफएफनुसार, यावेळचा सुपर कप विजेता संघही एएफसी चँपियन्स लीग दोन प्ले-ऑफसाठी पात्र ठरेल.

एफसी गोवाचा यावेळच्या सुपर कपमध्ये ब गटात, तर आयएसएल विजेता मोहन बागान सुपर जायंट्स संघ अ गटात आहेत. हे दोन्ही संघ सध्या एएफसी चँपियन्स लीग दोन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. या स्पर्धेच्या ड गटातील पहिल्या लढतीत मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवास इराकच्या अल झावरा क्लबविरुद्ध दोन गोलने हार पत्करावी लागली होती, त्यांचा पुढील सामना १ ऑक्टोबर रोजी ताजिकिस्तानमधील हिसोर येथे एफसी इस्तिक्लोल क्लबविरुद्ध होईल.

सुपर कप २०२५-२६ गटवारी

अ गट : मोहन बागान सुपर जायंट्स, चेन्नईयीन एफसी, ईस्ट बंगाल, रियल काश्‍मीर.

ब गट : एफसी गोवा, जमशेदपूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड, इंटर काशी एफसी.

क गट : बंगळूर एफसी, मोहम्मेडन स्पोर्टिंग, पंजाब एफसी, गोकुळम केरळा एफसी.

ड गट : मुंबई सिटी एफसी, केरळा ब्लास्टर्स, हैदराबाद एफसी, राजस्थान युनायटेड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT