Super Cup: जल्लोष! FC Goa ने रचला इतिहास; दोनवेळा सुपर कप पटकावणारा ठरला पहिला संघ

FC Goa wins Super Cup: स्पर्धेतील चारही सामने जिंकताना त्यांना २०२५-२६ मोसमातील एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठीही पात्रता मिळविली.
FC Goa wins Super Cup
FC Goa Super Cup 2025 winDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रेक्षणीय खेळ केलेल्या एफसी गोवाने शनिवारी ‘सुपर कप’ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावले. ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर त्यांनी जमशेदपूर एफसीवर ३-० असा एकतर्फी विजय नोंदविला. स्पॅनिश बोर्हा हेर्रेरा याने दोन आणि सर्बियन देयान द्राझिच याने एक गोल केला.

एफसी गोवाने यापूर्वी २०१९ मध्ये सुपर कप पटकावला होता. मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या दोन वर्षांच्या कालखंडात एफसी गोवाने जिंकलेला यावेळी जिंकलेला हा पहिला करंडक ठरला. स्पर्धेतील चारही सामने जिंकताना त्यांना २०२५-२६ मोसमातील एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठीही पात्रता मिळविली.

बोर्हा हेर्रेरा याने दोन प्रेक्षणीय गोल केले. पहिला गोल २२व्या, तर दुसरा गोल ५१व्या मिनिटास केला. पहिल्या वेळेस चेंडू दोन वेळा रिबाऊंड झाल्यानंतर ३२ वर्षीय मध्यरक्षकाने डाव्या पायाने चेंडूला अचूक दिशा दाखविली.

नंतर विश्रांतीनंतर सहाव्या मिनिटास बोर्हा याने अफलातून गोल केला. जमशेदपूर एफसीच्या बचावफळीस कल्पकतेने गुंगारा देत पुन्हा डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर बोर्हा याने गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला संधीच दिली नाही.

देयान द्राझिच याने ७२व्या मिनिटास गोल केला आणि जमशेदपूरच्या आव्हानातील हवाच निघून गेली. प्रतिस्पर्धी संघाची ऑफ-साईड व्यूहरचना कल्पकपणे भेदत २९ वर्षीय खेळाडूने डाव्या पायाने चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली, तेव्हा गोलरक्षक आल्बिनो याने आपली जागा सोडणे खूपच महागात पडले. सामन्याची अखेरची काही मिनिटे असताना जोरदार पाऊस झाला. एफसी गोवाने भर पावसात क्लीन शीट राखण्यात यश मिळविले. हेर्रेरा सामन्याचा मानकरी ठरला.

AIFF, I league Trophy Controversy
Churchill Brothers I-League controversyDainik Gomantak

दृष्टिक्षेपात...

एफसी गोवाचे सुपर कप स्पर्धेतील चारही सामन्यांत विजय; वि. वि. गोकुळम केरळा ३-०, पंजाब एफसी २-१, मोहन बागान ३-१, जमशेदपूर एफसी ३-०

आयएसएल स्पर्धेत दोन्ही लढती गमावल्यानंतर २०२४-२५ मोसमात एफसी गोवाचा जमशेदपूर एफसीवर पहिलाच विजय

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने मानोलो मार्केझ यांचा पहिला करंडक; यापूर्वी हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक या नात्याने २०२१-२२ मध्ये आयएसएल कप

बोर्हा हेर्रेराचे यावेळच्या सुपर कपमध्ये ४ गोल; २०२४-२५ मधील आयएसएल स्पर्धेत ६ गोल, ४ असिस्ट

सुपर कपमध्ये जमशेदपूर एफसीविरुद्ध एफसी गोवाचे ३ विजय, तर १ पराभव

FC Goa wins Super Cup
Super Cup 2025: महामुकाबला! FC Goa भिडणार धोकादायक मोहन बागानशी; उपांत्य फेरीतील महत्त्वपूर्ण लढत

दोन वेळा जिंकणारा पहिला संघ

सुपर कपच्या इतिहासात ही स्पर्धा दोन वेळा जिंकणारा एफसी गोवा पहिला संघ ठरला. एकंदरीत त्यांचे हे तिसरे मोठे यश ठरले. २०१९ मध्ये सुपर कप जिंकल्यानंतर २०१९-२० मध्ये आयएसएल लीग शिल्ड पटकावून २०२१ मधील एएफसी चँपियन्स लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय संघ हा मान मिळविला होता.

FC Goa wins Super Cup
Super Cup: FC Goa इतिहास घडवणार का? सुपर कपसाठी जमशेदपूरविरुद्ध लढत; एकाच सामन्यात 2 पराक्रम करण्याची संधी

शिरगाव जत्रा चेंगराचेंगरीप्रकरणी शोक

शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रौत्सवातील चेंगराचेंगरीप्रकरणी एफसी गोवा संघ शोक प्रकट करताना अंतिम लढतीत संघ काळ्या रंगाची हातपट्टी बांधून खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com