Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Super Cup 2025: महामुकाबला! FC Goa भिडणार धोकादायक मोहन बागानशी; उपांत्य फेरीतील महत्त्वपूर्ण लढत

FC Goa vs Mohun Bagan: ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या सुपर कप फुटबॉल स्पर्धेसाठी मोहन बागान संघ प्रमुख खेळाडूंविना खेळत आहे, तरीही ते धोकादायक आहेत.

Sameer Panditrao

पणजी: ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या सुपर कप फुटबॉल स्पर्धेसाठी मोहन बागान संघ प्रमुख खेळाडूंविना खेळत आहे, तरीही ते धोकादायक आहेत. त्यामुळे कलिंगा स्टेडियमवर बुधवारी (ता. ३०) उपांत्य लढतीत एफसी गोवाचे पारडे जड असले, तरी त्यांना सावध राहावे लागेल. स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना मुंबई सिटी एफसी व जमशेदपूर एफसी यांच्यात प्रकाशझोतात खेळला जाईल.

मोहन बागानसाठी २०२४-२५ मधील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मोसम अतिशय सफल ठरला. या स्पर्धेत त्यांनी शिल्ड आणि करंडक जिंकून दुहेरी यश साधले. दुसरीकडे आयएसएल साखळी फेरीत द्वितीय स्थान, तर करंडकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या एफसी गोवाने मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली सुपर कप जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे.

FC Goa Players

सुपर कपच्या उपांत्यपूर्व लढतीत प्रमुख खेळाडू नसतानाही मोहन बागानने पूर्ण क्षमतेने खेळणाऱ्या केरळा ब्लास्टर्सला २-१ असे पराभूत केले. ही स्पर्धा मोहन बागान संघातील युवा खेळाडूंसाठी संधी असल्याचे मत या संघाचे प्रशिक्षक बस्ताब रॉय यांनी व्यक्त केले.

एफसी गोवा संघ पंजाब एफसीविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत ८८व्या मिनिटापर्यंत एका गोलने पिछाडीवर होता, मात्र नंतर लागोपाठ दोन गोल करून त्यांनी २-१ विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली. बुधवारच्या लढतीविषयी मार्केझ यांनी सांगितले, की ‘सुपर कप जिंकण्यासाठी ओळीने चार विजय आवश्यक आहेत हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक सामना खडतर आहे. त्याचवेळी करंडक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.’

मोहन बागानचे भारतीय खेळाडू दर्जेदार

आपला संघ पूर्ण क्षमतेने सर्व परदेशी खेळाडूंसह स्पर्धेत खेळत असला, तरी बलाढ्य असल्याचे मार्केझ यांनी नाकारले. ते म्हणाले, की ‘पंजाबविरुद्ध आम्ही पराभूत होण्याच्या मार्गावर होतो. त्या संघात फक्त दोघेच परदेशी खेळाडू होते. अर्थात, संघातील परदेशी खेळाडू महत्त्वाचे आहेत, त्याचवेळी मोहन बागान संघातील भारतीय खेळाडूही खूप चांगले आहेत. लोकांना वाटते की अधिक परदेशी खेळाडूंचा संघ बलाढ्य असतो, पण प्रत्यक्षात तसे नसते.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT