Super Cup 2025: ..शेवटच्या मिनिटात फिरवली मॅच! FC Goa चे पिछाडीवरून अफलातून पुनरागमन; पंजाबवर 2-1 अशी मात

FC Goa Vs Punjab FC: एफसी गोवा आणि पंजाब एफसी यांच्यातील सामना रंगतदार ठरला. गोलशून्य पूर्वार्धानंतर पुल्गा विदाल याने रिबाऊंडवर ५७व्या मिनिटास पंजाब एफसीला आघाडी मिळवून दिली.
FC Goa Vs Punjab FC
Super Cup 2025 FC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखेरचे एक मिनिट बाकी असताना बरोबरी आणि नंतर भरपाई वेळेतील खेळात विजयी गोल नोंदवत एफसी गोवा संघाने अफलातून मुसंडी मारली आणि सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर शनिवारी उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी पंजाब एफसीवर एका गोलच्या पिछाडीवरून २-१ असा झुंझार विजय मिळविला.

सामन्याच्या ८९व्या मिनिटास बोर्हा हेर्रेरा याने बरोबरीचा गोल केल्यानंतर ९०+२ व्या मिनिटास बदली खेळाडू महंमद यासीर याने केलेला गोल एफसी गोवासाठी निर्णायक ठरला. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर आता मोहन बागान सुपर जायंट्सचे आव्हान असेल. हा सामना ३० एप्रिल रोजी खेळला जाईल. आयएसएल लीग शिल्ड व करंडक विजेत्या मोहन बागानने आगेकूच राखताना केरळा ब्लास्टर्सला २-१ फरकाने पराभूत केले.

एफसी गोवा आणि पंजाब एफसी यांच्यातील सामना रंगतदार ठरला. गोलशून्य पूर्वार्धानंतर पुल्गा विदाल याने रिबाऊंडवर ५७व्या मिनिटास पंजाब एफसीला आघाडी मिळवून दिली. या गोलसह पंजाब एफसी उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करत असताना एफसी गोवाने जबदरस्त उसळी घेतली. पंजाब एफसीच्या बचावात्मक व्यूहरचनेस चोख उत्तर देताना एफसी गोवाने आक्रमक धोरण अवलंबिले.

FC Goa Vs Punjab FC
Super Cup 2025: FC Goa समोर पंजाब एफसीचे आव्हान, उपांत्य फेरीसाठी रंगणार सामना

सामन्यातील एक मिनिट बाकी असताना हेर्रेरा याने चेंडू छातीवर नियंत्रित केला आणि सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक मुहीत शब्बीर याला चेंडू अडविण्याची संधीच दिली नाही. भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटास यासीरचा डाव्या पायाचा फटका खूपच वेगवान ठरला आणि एफसी गोवाच्या अनपेक्षित विजयावर शिक्कामोर्तब झाले. सामन्याच्या ८०व्या मिनिटास यासीर बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरला होता. ९०+५ व्या मिनिटास पंजाब एफसीच्या प्रमवीर सिंग याला रेड कार्ड दाखविण्यात आले.

FC Goa Vs Punjab FC
Super Cup 2025: दणदणीत विजयासह FC Goa उपांत्यपूर्व फेरीत दाखल, ग्वॉर्रोचेनाची शानदार हॅटट्रिक

दृष्टिक्षेपात...

पंजाब एफसीविरुद्ध एफसी गोवा सलग ५ सामने अपराजित

एफसी गोवाचे पंजाब एफसीविरुद्ध ४ विजय, १ बरोबरी

एफसी गोवाचे २०२४-२५ मोसमात पंजाब एफसीविरुद्ध सलग ३ विजय

२०१९ मध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर एफसी गोवा प्रथमच सुपर कपच्या उपांत्य फेरीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com