Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: ..टॉस जिंकला, पण सामना गमावला! गोव्याच्या फलंदाजांची हाराकिरी; झारखंडकडून 15 धावांनी पराभव

State A Trophy: एलिट ब गटातील सामना शनिवारी बडोदा येथील जीएसएफसी मैदानावर झाला. नाणेफेक जिंकून गोव्याने झारखंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाने अखेरच्या सहा विकेट ५५ धावांत गमावल्या, परिणामी त्यांना स्टेट ए करंडक एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत झारखंडकडून १५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

एलिट ब गटातील सामना शनिवारी बडोदा येथील जीएसएफसी मैदानावर झाला. नाणेफेक जिंकून गोव्याने झारखंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यांनी पाच बाद १३६ वरून सर्वबाद २६९ धावांपर्यंत मजल मारली.

गोव्यातर्फे कुतबुदिन जमादार याने ५५ धावांत ४ गडी बाद केले. नंतर विजयासाठी २७० धावांची आवश्यकता असताना गोव्याने ४ बाद १९९ वरून पराभव ओढवून घेताना सर्वबाद २५४ धावा केल्या. कर्णधार शिवेंद्र भुजबळ (६९) व आर्यन नार्वेकर (५३) यांची पाचव्या विकेटची ११९ धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर गोव्याचा डाव गडगडला. झारखंडच्या अमित कुमार याने ३७ धावांत ४ गडी टिपले. गोव्याचा चार लढतींतील तिसरा पराभव ठरला.

संक्षिप्त धावफलक : झारखंड : ४९.३ षटकांत सर्वबाद २६९ (यश भगत ३७, राजन दीप ४१, रवी शर्मा ७०, शुभ शर्मा ३४, तनिश नाबाद २९, विनायक कुंटे १०-१-६३-१, कुतबुदिन जमादार ९.३-१-५५-४, मनीष काकोडे ६-०-३८-१, जीवनकुमार चित्तेम ४-०-२३-१) वि. वि. गोवा : ४८ षटकांत सर्वबाद २५४ (वीर यादव ४४, शिवेंद्र भुजबळ ८९, आर्यन नार्वेकर ५३, कुतबुदिन जमादार ८, अमित कुमार ९-१-३७-४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT