Goa Sports News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Sports: फुटबॉलमध्ये 'ख़ुशी', क्रिकेटमध्ये 'गम'; कसे राहिले गोव्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी वर्ष जाणून घ्या

Goa Sports 2024 Overview: मावळते २०२४ वर्ष गोमंतकीय क्रीडा क्षेत्रासाठी फार मोठे उत्साहवर्धक ठरले नाही. मोजकेच अपवाद वगळता गोमंतकीय क्रीडापटू-संघ मोठी भरारी घेताना दिसले नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

Flashback Goa Sports 2024

पणजी: व्यावसायिक फुटबॉलमध्ये एफसी गोवाने २०२३-२४ मधील आयएसएल स्पर्धच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, तर राष्ट्रीय साखळी व आय-लीग मिळून पाच वेळच्या माजी विजेत्या धेंपो क्लबने नऊ मोसमानंतर पुन्हा आय-लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याचा पराक्रम साधला.

गोवा फुटबॉल असोसिएशनने राज्य सरकारच्या मदतीने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा सुरू केली. एकाच वर्षी दोन आवृत्त्या झाल्या. दोन्ही वेळेस एफसी गोवाने बाजी मारली. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया-अर्जेंटिनातील संघ सहभागी झाल्यामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झाले. महिला फुटबॉलमध्ये पर्ल फर्नांडिस हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

क्रिकेटमध्ये गोव्याची पीछाडीच पाहायली मिळाली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत २०२३-२४ मध्ये एलिट श्रेणीत ३१वा क्रमांक मिळाल्यामुळे गोव्यावर २०२४-२५ मध्ये प्लेट श्रेणी खेळण्याची वेळ आली. यावेळच्या प्लेट श्रेणीत सर्व पाचही सामने जिंकून गोव्याने पुन्हा एकदा रणजी एलिट श्रेणीसाठी पात्रता मिळविली. गोव्याचे माजी रणजीपटू, आता अनुभवी क्रिकेट पंच असलेले सय्यद खलिद यांनी वानखेडे स्टेडियमवर मुंबई व विदर्भ यांच्यातील रणजी करंडक अंतिम सामन्यात पंचगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई यांनी जबाबदारी पार पाडली. फलंदाज सुयश प्रभुदेसाई दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळला, तर सय्यद मुश्ताकी अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हॅट्‌ट्रिक साधणारा फेलिक्स आलेमाव पहिला गोमंतकीय गोलंदाज ठरला.

बिहारमध्ये झालेल्या ३३व्या राष्ट्रीय सबज्युनियर कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या मुलींनी ब्राँझपदक प्राप्त केले. वर्षभरात गोव्याने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांत तीन पदके जिंकली. राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेतही गोव्याच्या मुला व मुलींच्या संघाने ब्राँझपदकाची कमाई केली होती.

गोव्याचा सर्वांत युवा ‘आयएम’

गोव्याचा बुद्धिबळातील सर्वांत युवा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू बनण्याचा विक्रम एथन वाझ याने साकारला. १२ वर्षे व ४ महिन्यांचा असताना त्याने बुडापेस्ट-हंगेरी येथील स्पर्धेत तिसरा आयएम नॉर्म प्राप्त केला. यापूर्वी २०१९ साली गोव्याचा लिऑन मेंडोन्सा १२ वर्षे व ११ महिन्यांचा असताना आयएम बुद्धिबळपटू ठरला होता. याशिवाय एथनने राष्ट्रकुल युवा बुद्धिबळ स्पर्धेत सबज्युनियर (१६ वर्षांखालील) वयोगटात सुवर्णपदक जिंकण्याचाही पराक्रम साधला.

जलतरणात आश्वासक चित्र

जलतरणात पूर्वी नाईक व आरोही बोर्डे यांच्यामुळे आश्वासक चित्र दिसले. ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेत पूर्वी नाईक हिने सुवर्णासह चार पदके जिंकली. तिने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३०.७० सेकंदात पूर्ण करून

सुवर्णपदकाची कमाई केली. शिवाय १०० मीटर फ्रीस्टाईल व ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य, तर २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ब्राँझपदक जिंकले. आरोही हिने राजकोट येथे झालेल्या ६८व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत सुवर्ण, तर १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.

एव्हरेस्टला गवसणी

जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालणारा पंकज नार्वेकर पहिला गोमंतकीय गिर्यारोहक ठरला. त्याने २१ मे रोजी ऐतिहासिक कामगिरी बजावली. पंकज ४१ वर्षीय आहे. माऊंट एव्हरेस्ट ८,८४८.८६ मीटर उंचीवर आहे.

स्नेहल-कश्यपची ऐतिहासिक भागीदारी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट श्रेणीत पर्वरी येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना गोव्याच्या स्नेहल कवठणकर (नाबाद ३१४) व कश्यप बखले (नाबाद ३००) यांनी ऐतिहासिक त्रिशतके नोंदवताना रणजी करंडक स्पर्धेत ६०६ धावांच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला. डाव घोषित झाल्याने ६२४ धावांचा जागतिक विक्रम त्यांना थोडक्यात हुकला.

तब्बल २८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये गोमंतकीय

दुबई येथे जन्मलेली २१ वर्षीय गोमंतकीय बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अश्विनी पोन्नाप्पा हिच्या साथीत महिला दुहेरीत प्रतिनिधित्व केले. मूळ गोमंतकीय क्रीडापटू ऑलिम्पिकमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर खेळताना दिसला. अटलांटा ऑलिम्पिकमध्ये १९९६ साली लिएंडर पेस याने टेनिसमधील पुरुष एकेरीत ऐतिहासिक ब्राँझपदक जिंकले होते. गोमंतकीय वंशाचा क्रीडापटू ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची ती अखेरची वेळ होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT