
Santosh Trophy 2024-25 Football Goa VS Delhi
पणजी: संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील पाच वेळच्या माजी विजेत्या आणि गतउपविजेत्या गोव्यावर यंदा साखळी फेरीतच गारद होण्याची वेळ आली. ब गटातील अखेरच्या साखळी फेरी लढतीत त्यांना दिल्लीने गोलशून्य बरोबरीत रोखले.
हैदराबादमधील डेक्कन अरेनावर मंगळवारी रात्री झालेल्या लढतीत गोव्यासाठी विजय अत्यावश्यक होता; पण त्यांना पूर्ण तीन गुण प्राप्त करणे शक्य झाले नाही. ८९व्या मिनिटास दिल्लीच्या मिलिंद नेगी याला रेड कार्ड दाखविले. प्रतिस्पर्ध्यांचा एक खेळाडू कमी झाल्याचा लाभही नंतर गोव्याला उठवता आला नाही. या गटातील अगोदरच्या लढतीत ओडिशाने मेघालयास गोलशून्य बरोबरीत, तर केरळने तमिळनाडूस १-१ असे गोलबरोबरीत रोखले होते.
ब गट साखळी फेरीतील सर्व संघांची मोहीम संपली. प्रत्येकी पाच सामने खेळल्यानंतर केरळचे सर्वाधिक १३, मेघालयाचे ८, दिल्लीचे ७, तर ओडिशाचे ५ गुण झाले. हे चारही संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. गोवा (४ गुण) व तमिळनाडू (३ गुण) या संघांना स्पर्धेत आगेकूच राखता आली नाही. एकंदरीत गोव्याने एक विजय, एक बरोबरी व तीन पराभव अशी कामगिरी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.