Singapore vs India football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Asia Cup 2025 : भारतीय संघाने दवडली संधी! पात्रता लढतीत सिंगापूरची मुसंडी; युईयाँगचे शानदार प्रदर्शन

Singapore vs India Football: सामन्याच्या आरंभी लाल्लियानझुआला छांगटे याच्या गोलमुळे आघाडी घेऊन काही काळ वर्चस्व गाजवलेल्या भारतीय फुटबॉल संघाला नंतर संधी साधणे शक्य झाले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामन्याच्या आरंभी लाल्लियानझुआला छांगटे याच्या गोलमुळे आघाडी घेऊन काही काळ वर्चस्व गाजवलेल्या भारतीय फुटबॉल संघाला नंतर संधी साधणे शक्य झाले नाही.

साँग युईयाँग याच्या दोन शानदार गोलमुळे सामना २-१ फरकाने जिंकून सिंगापूरने आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील आव्हान कायम राखले, तर पराभवामुळे खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.

आशिया करंडक पात्रता फेरीच्या क गटातील सामना मंगळवारी गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. या विजयासह सिंगापूरने आठ गुणांसह हाँगकाँगला अव्वल स्थानी गाठले आहे. भारताचा पात्रता फेरीतील पुढील सामना बांगलादेशविरुद्ध १८ नोव्हेंबर रोजी अवे मैदानावर खेळला जाईल.

फातोर्ड्यात भारताचा सातवा पराभव

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळलेल्या १७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताला सातवा पराभव पत्करावा लागला. पाच लढतीत विजय, तर पाच लढती बरोबरीत राहिल्या आहेत. यापूर्वी २००४ मध्ये विश्वकरंडक पात्रता लढतीत भारताने सिंगापूरला १-० फरकाने हरविले होते, पण त्याची पुनरावृत्ती २१ वर्षांनंतर होऊ शकली नाही.

‘क’ गट गुणतक्ता

संघ सामने विजय बरोबरी पराभव गोलफरक गुण

हाँगकाँग ४ २ २ ० +२ ८

सिंगापूर ४ २ २ ० +२ ८

बांगलादेश ४ ० २ २ -२ २

भारत ४ ० २ २ -२ २

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT