Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

Goa vs Baroda Under 23 Cricket Match: गोव्याने शानदार अष्टपैलू खेळ करत २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘क’ सामन्यात बडोद्यावर वर्चस्व राखले.
Goa vs Baroda Under 23 Cricket Match
Under 23 CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याने शानदार अष्टपैलू खेळ करत २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘क’ सामन्यात बडोद्यावर वर्चस्व राखले. त्यांना मोठ्या आघाडीची संधी आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर सामना सुरू आहे.

गोव्याने पहिल्या दिवशी ४ बाद २२७ धावा केल्या होत्या. मंगळवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा डाव ३२२ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर दिवसअखेर बडोदा संघाची पहिल्या डावात ८ बाद १६४ अशी स्थिती होती. ते अजून १५८ धावांनी मागे आहेत.

Goa vs Baroda Under 23 Cricket Match
SIR Process Goa: 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8' डावलता येणार नाही! गोवा खंडपीठात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

गोव्याच्या डावात काल ७६ धावांवर नाबाद असलेला कर्णधार आर्यन नार्वेकर ८२ धावांवर बाद झाला. दुसरा नाबाद फलंदाज जीवन चित्तेम याने ५९ धावांची खेळी केली. अनुज यादव (नाबाद ४९) व राहुल विश्वकर्मा (१५) यांनी अखेरच्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला सव्वातीनशे धावांच्या जवळपास जाता आले. नंतर राहुल विश्वकर्मा (३-३७) व अनुज यादव (३-३६) यांनी प्रभावी मारा करताना बडोद्याच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (४ बाद २२७ वरून) : ११७ षटकांत सर्वबाद ३२२ (आर्यन नार्वेकर ८२, जीवन चित्तेम ५९, दीप कसवणकर ११, अनुज यादव नाबाद ४९, फरदीन खान ०, रुद्रेश शर्मा ०, राहुल विश्वकर्मा १५, हर्षित मौर्य ४-४८, हेनिल पटेल ३-४८, दीप पटेल ३-३०).

बडोदा, पहिला डाव : ५२ षटकांत ८ बाद १६४ (भविष्य पटेल ३३, आयुष राजगोर ५३, दीप पटेल २२, केयूर काळे नाबाद ३०, रुद्रेश शर्मा ९-१-२०-०, राहुल विश्वकर्मा १०-१-३७-३, फरदीन खान ९-१-४१-१, अनुज यादव १७-३-३६-३, दीप कसवणकर ७-१-२५-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com