Gonychi League T20 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Gonychi League T20: 8 चौकार, 5 षटकार...'धेंपो'च्या विजयात अभिनवची स्फोटक फलंदाजी

Sanguem Cricketers Gonychi League T20: सांगे क्रिकेटर्सच्या गोंयची लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा रणजीपटू डावखुरा अभिनव तेजराणा याने स्फोटक फलंदाजी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सांगे क्रिकेटर्सच्या गोंयची लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा रणजीपटू डावखुरा अभिनव तेजराणा याने स्फोटक फलंदाजी केली. त्या बळावर धेंपो क्रिकेट क्लबने सीको क्रिकेट क्लबला सहा विकेट्स राखून हरविले.

सामना मडगाव क्रिकेट क्लबच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर प्रकाशझोतात झाला. अभिनव याने अवघ्या ३१ चेंडूंत आठ चौकार व पाच षटकारांच्या नाबाद ७७ धावा केल्या. त्यामुळे धेंपो क्लबने १५.४ षटकांतच ४ बाद १९६ धावा करून सामना लीलया जिंकला.

सीको क्लबने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९१ धावा केल्या होत्या. संक्षिप्त धावफलक ः सीको क्रिकेट क्लब ः २० षटकांत ४ बाद १९१ (राजशेखर हरिकांत १४, दीप कसवणकर ५२, चिराग जानी नाबाद ७३, अंश गोसाई नाबाद ३७, सागर सोळंकी ४-०-३१-२) पराभूत वि. धेंपो क्रिकेट क्लब ः १५.४ षटकांत ४ बाद १९६ (आनंद तेंडुलकर ३५, अभिनव तेजराणा नाबाद ७७, मणिशंकर मुरासिंग नाबाद २१, कुतबुदिन जमादार ३-०-२१-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT