

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त आघाडी उभारावी, असे आवाहन ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी केले.
आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी बोलताना परब म्हणाले, काहीजण आम्हाला संयम बाळगण्याचा सल्ला देतात; मात्र ठाम भूमिकेमुळेच हा लढा उभा राहिला आहे. आमदार वीरेश बोरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्डचे आमदार एकत्र उभे राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. हे ऐक्य आगामी निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावे, असेही ते म्हणाले.
इतर विरोधी पक्षांनी आरजीसोबत युती करण्याबाबत आपली भूमिका उघडपणे जाहीर करावी अशी मागणी करत परब म्हणाले की, संबंधित पक्षांनी नकार दिल्यास आणि त्यांच्या आमदारांना खरोखरच आघाडी हवी असल्यास त्यांनी आरजीमध्ये सामील व्हावे. विरोधी आमदारांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनीही संयुक्त विरोधी आघाडीची गरज अधोरेखित केली. दिल्लीस्थित पक्षाचा भाग असूनही राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आपण पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर दबाव आणू. नेतृत्व सहमत नसेल तर योग्य तो निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.