Rohit Sharma, Vijay Hazare Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rohit Sharma: "रोहित को बोलिंग दो"! शून्यावर आउट गेला तरी 'हिटमॅन'ची क्रेझ कायम; प्रेक्षकांनी केली गोलंदाजी देण्याची मागणी

Rohit Sharma Vijay Hazare Trophy: सर्वांसाठी आकर्षण असलेला रोहित शर्मा शून्यावर आणि तेही पहिल्याच चेंडूवर बाद झाला तरी त्याची क्रेझ काही कमी झाली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

जयपूर: सर्वांसाठी आकर्षण असलेला रोहित शर्मा शून्यावर आणि तेही पहिल्याच चेंडूवर बाद झाला तरी त्याची क्रेझ काही कमी झाली नाही. तो क्षेत्ररक्षणाला आल्यावर पुन्हा खच्चून गर्दी झाली आणि मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडचा ५१ धावांनी पराभव केला.

मुंबईचा हा स्पर्धेतला सलग दुसरा विजय आहे. मुंबईने प्रथम फलंदाजीत सात बाद ३३१ धावा केल्या. यात सर्फराझ आणि मुशीर या खान बंधूंनी केलेली प्रत्येकी ५५ धावांची खेळी, तसेच हार्दिक तामोरेच्या नाबाद ९३ धावा महत्त्वाच्या ठरल्या.

उत्तराखंडनेही या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली लढत दिली. अखेर ५०व्या षटकाअखेर त्यांना नऊ बाद २८० धावा करता आल्या.

रोहितला फलंदाजी करताना पाहण्याची संधी आज हुकली असली तरी त्याला गोलंदाजीकरिता पाहू दे, यासाठी प्रेक्षकांनी एक दो... रोहित को बोलिंग दो... असा घोष सुरू केला; परंतु मुंबई कर्णधार शार्दुल ठाकूरने त्याकडे दुर्लक्ष केले. या विजय हजारे स्पर्धेत रोहित शर्मा केवळ दोनच सामने खेळणार होता. त्यामुळे आजचा सामना संपल्यानंतर तो मुंबईसाठी रवाना झाला.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई ः ५० षटकांत ७ बाद ३३१ (मुशीर खान ५५ धावा, सर्फराझ खान ५५ धावा, हार्दिक तामोरे नाबाद ९३ धावा, देवेंद्रसिंग बोरा १०-०-७४-३) वि. वि. उत्तराखंड ः ५० षटकांत ९ बाद २८० (युवराज चौधरी ९६ धावा, कुणाल चंडेला ३२, संस्कार रावत २४, जगदीशा सुचित ५१ धावा, शार्दुल ठाकूर ७-१-२८-२, ओंकार तरमाले ७-०-४०-२, मुशीर खान ८-०-५७-२)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'2026'चं स्वागत करा ग्लॅमरस! बागा बीचवर तमन्ना भाटिया लावणार हजेरी; असे आहेत तिकीट दर

राष्ट्रपती द्रैपदी मुर्मू चार दिवसांच्या गोवा, कर्नाटक, झारखंडच्या दौऱ्यावर; कारवार बंदरातून करणार पाणबुडी सफर

Goa News Live: ODP बायपास ते दामियान दी गोवा आणि कदंब हॉटेल ते ओकोकेरो जंक्शन दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

Mandrem: मांद्रेतील जमिनी विकू देणार नाही! सरपंच फर्नांडिस यांचा निर्धार; भूमिपुत्रांसाठी जागा सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

Goa Congress: जि.पं., विद्यापीठ निवडणुकांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी! LOP आलेमाव य़ांचे प्रतिपादन; विजयी उमेदवारांचा मडगावात गौरव

SCROLL FOR NEXT