Rohit Sharma Century Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rohit Sharma Century: 'हिटमॅन'चा झंझावात! रोहित शर्मानं ठोकलं वादळी शतक; सचिन-विराटच्या 'स्पेशल' क्लबमध्ये सामील VIDEO

Rohit Sharma Record : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे.

Manish Jadhav

Rohit Sharma Record: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. जानेवारी महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार असून त्यापूर्वीच रोहितने आपल्या बॅटची जादू दाखवण्यास सुरुवात केली. सध्या तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळत असून शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात रोहितने सलामीवीर म्हणून मैदानात उतरुन अवघ्या 62 चेंडूंत आपले धडाकेबाज शतक पूर्ण केले.

सिक्कीमविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) कोणत्याही दबावाखाली दिसला नाही. त्याने आपल्या नैसर्गिक शैलीत खेळत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सुरुवातील त्याने अवघ्या 27 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर वेग वाढवत केवळ 62 चेंडूंत शंभर धावांचा टप्पा गाठला. रोहितच्या या शतकी खेळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने केलेल्या 100 धावांपैकी 80 धावा या केवळ 8 चौकार आणि 8 गगनभेदी षटकारांच्या मदतीने आल्या होत्या. उर्वरित केवळ 20 धावा त्याने धावून पूर्ण केल्या, यावरुन त्याच्या आक्रमकतेचा अंदाज येतो. हे रोहित शर्माचे लिस्ट-ए क्रिकेटमधील 37 वे शतक असून त्याच्या या खेळीने पुन्हा एकदा चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीत आता रोहितने सहावे स्थान पटकावले. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर 538 डावांमध्ये 60 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली 57 शतकांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रोहितच्या पुढे आता सचिन आणि कोहली व्यतिरिक्त ग्राहम गूच, ग्रीम हिक आणि कुमार संगकारा हेच खेळाडू उरले आहेत. ज्या वेगाने रोहित सध्या धावा करत आहे, ते पाहता तो लवकरच जगातील अव्वल तीन फलंदाजांमध्ये आपली जागा निश्चित करेल अशी चिन्हे दिसत आहेत.

रोहित शर्माने यापूर्वीच टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, त्यामुळे त्याचे संपूर्ण लक्ष आता फक्त एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रित झाले आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट 2027 मध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या विश्वचषकासाठी त्याने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा विजय हजारे ट्रॉफी, रोहितचा प्रत्येक शॉट त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीची साक्ष देत आहे. आगामी न्यूझीलंड मालिकेपूर्वी रोहितचा हा फॉर्म भारतीय संघासाठी (Team India) खूप मोठा दिलासा मानला जात असून तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये अजून एक सामना खेळण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT