

Syed Mushtaq Ali Trophy: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तथापि, तो आयपीएलमध्ये सक्रिय आहे. दरम्यान, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. रोहित आता फक्त वनडे फॉर्मेट खेळतो, म्हणून तो त्याचा सराव सुरु ठेवण्यासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळू इच्छित असल्याचे सांगितले जात आहे. चला तर मग हिटमॅन कधी आणि कुठे खेळताना दिसणार? याविषयी जाणून घेऊया...
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबई क्रिकेट असोसिएशनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. ही प्रतिष्ठित भारतीय स्पर्धा सुरु आहे, मुंबईने आतापर्यंत खेळलेले सर्व चार सामने जिंकले आहेत. ते बाद फेरीत पोहोचतील हे निश्चित आहे. सुपर लीग स्टेज 12 डिसेंबरपासून सुरु होत आहे आणि रोहित शर्मा त्या दिवशी मैदानात उतरु शकतो. तथापि, तो कोणत्या संघाविरुद्ध खेळेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) गट अ मध्ये मुंबई, आंध्र, केरळ, विदर्भ, आसाम, रेल्वे, छत्तीसगड आणि ओडिशा यांचा समावेश आहे. मुंबईने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. बाद फेरीत त्यांचे स्थान जवळजवळ निश्चित आहे. स्पर्धेत चार गट आहेत, ज्यामध्ये अव्वल संघ आणि प्रत्येक गटातून तीन उपविजेते पुढील टप्प्यात जातील. त्यामुळे, मुंबई कोणत्या संघाविरुद्ध खेळेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
रोहित शर्मा हा टी-20 फॉरमॅटमधील शानदार फलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 140 च्या स्ट्राईक रेटने 4231 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या 267 डावांमध्ये 7046 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 47 अर्धशतके आणि दोन शतके आहेत. मात्र रोहितने 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती जाहीर केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.