Rohan Gawas Desai Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

BCCI: रोहन यांच्या प्रतिनिधित्वावर शिक्कामोर्तब! संयुक्त सचिवास दिलासा; अंतिम मतदार यादीत समावेश

Goa Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये (जीसीए) चेतन देसाई-विनोद (बाळू) फडके गट, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) रोहन गावस देसाई असे समीकरण आता नक्‍की झाले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये (जीसीए) चेतन देसाई-विनोद (बाळू) फडके गट, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) रोहन गावस देसाई असे समीकरण आता नक्‍की झाले आहे.

रोहन यांच्या प्रतिनिधी नियुक्तीला गोवा क्रिकेट असोसिएशनचे मावळते अध्यक्ष विपुल फडके यांनी बीसीसीआय निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपाची शुक्रवारी पडताळणी झाली, त्यानंतर निवडणूक अधिकारी ए.के. जोती यांनी अंतिम निवडणूक मतदार यादी घोषित केली. त्‍यात रोहन यांना दिलासा मिळाला आहे. ‘सत्यमेव जयते’, एवढीच प्रतिक्रिया रोहन यांनी दिली.

१३ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या बीसीसीआय मतदार यादी मसुद्यात रोहन यांचे नाव जीसीए प्रतिनिधी या नात्याने समाविष्ट केले होते, त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी विपुल यांनी रोहन यांच्या नावाला आक्षेप घेताना त्यांचे नामनिर्देशन जीसीएच्या घटनेनुसार नसून ते अधिकृतपणे पाठविण्यात आलेले नसल्याचे बीसीसीआय निवडणूक अधिकारी कार्यालयास पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाची प्रत आणि जीसीए व्यवस्थापकीय समितीतील बहुसंख्य सदस्यांनी पत्र फिरवून घेतलेला ठराव या आधारे जीसीएच्या मावळत्या समितीचे संयुक्त सचिव रुपेश नाईक यांनी बीसीसीआय निवडणुकीसाठी जीसीएचा प्रतिनिधी या नात्याने आपले नामनिर्देशन केले होते, असे रोहन यांनी स्पष्ट केले होते.

बीसीसीआय निवडणूक अधिकारी कार्यालयास सदस्य संघटनेतर्फे नियुक्त प्रतिनिधीचे नाव पाठविण्याची १२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत मुदत होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार जीसीए व्यवस्थापकीय समितीची १२ रोजी बैठक झाली, परंतु त्या बैठकीत प्रतिनिधी नियुक्तीवर निर्णय होऊ शकला नव्हता.

व्यवस्थापकीय समितीतील पाच सदस्यांनी रोहन यांच्या नावाचा ठराव मंजूर केला होता, तर मावळते सचिव सचिव शंभा नाईक देसाई यांनी विपुल फडके यांचे नाव सुचविले होते. अधिकृत निर्णय न झाल्यामुळे जीसीए मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने ठरलेल्या मुदतीत नाव पाठविण्यास असमर्थ असल्याचे बीसीसीआय निवडणूक अधिकारी कार्यालयास कळविले होते, असे बैठकीनंतर सांगण्यात आले होते.

राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये संधी हुकली

रोहन गावस देसाई यांचे समर्थन लाभलेल्या ‘जीसीए परिवर्तन’ गटाला १६ सप्टेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापकीय समिती निवडणुकीत सर्व सहाही जागांवर पराभव पत्करावा लागला होता. चेतन देसाई-विनोद (बाळू) फडके यांच्या गटाने सर्व जागांवर विजय मिळवून दणदणीत यश प्राप्त केले होते.

बीसीसीआयमधील पद कायम राहणार?

यावर्षी एक मार्च रोजी रोहन गावस देसाई यांची बीसीसीआय संयुक्त सचिवपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यापूर्वी त्यांनी जीसीए सचिवपदाचा राजीनामा दिला होता. आता येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत रोहन यांना मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहेत. बीसीसीआय निवडणुकीसाठी २० व २१ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज सादर केले जाणार असून उमेदवारांची अंतिम यादी २३ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. २८ सप्टेंबर रोजी पाच पदाधिकारी जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला करा राशीनुसार 'या' गोष्टींचे दान, पितर होतील प्रसन्न; व्हाल धन-समृद्धीने संपूर्ण

Hamlet: इटलीत पोचला गोमंतकीय अभिनेता, शेक्सपियरचे 'हॅम्लेट' साकारतोय केतन; थिएटर हाऊसतर्फे प्रयोग केला सादर

Colva: कोलव्यातील दुकानदारांचे तात्पुरते स्थलांतर! पर्यटनमंत्री खंवटेंचे आश्वासन; पहिल्या टप्प्यात विविध सुविधांचा समावेश

First AI Minister: जगातील पहिली एआय मंत्री, संसदेत केले भाषण; भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी अल्बानियात टेक प्रयोग Watch Video

11 गायी ठार; काणकोण - कारवार महामार्गावर पहाटेच्या सुमारास झाला भीषण अपघात

SCROLL FOR NEXT