Arjun Teandulkar Goa Ranji  INT
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: प्लेट करंडकासाठी गोवा नागालँड लढत सुरु; अर्जुन तेंडुलकर जायबंदी, अमूल्यला पुनरागमनाची संधी

Goa Vs Nagaland: दर्शन मिसाळच्या नेतृत्वाखालील गोव्याने रणजी करंडक प्लेट विभागीय फेरीत सर्व पाचही सामने जिंकताना तुलनेत कमजोर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले.

Sameer Panditrao

Goa Vs Nagaland Ranji Trophy Cricket Match

पणजी: तुलनात्मकदृष्ट्या विचार करता रणजी करंडक प्लेट विजेतेपदासाठी गोव्याचे पारडे जड आहे, पण नागालँडकडेही साफ दुर्लक्ष करता येणार नाही. पाच दिवसीय अंतिम सामना गुरुवारपासून (ता. २३) सोविमा येथील नागालँड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

दर्शन मिसाळच्या नेतृत्वाखालील गोव्याने रणजी करंडक प्लेट विभागीय फेरीत सर्व पाचही सामने जिंकताना तुलनेत कमजोर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. मात्र विजयी वाटचालीत गतवर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस नागालँडनेच त्यांना विजयासाठी झुंजविले होते. दर्शन व राहुल मेहता यांची फिरकी दुसऱ्या डावात वरचढ ठरल्यामुळे गोव्याने सामना ८३ धावांनी जिंकला होता. राँगसेन जोनाथन याच्या नेतृत्वाखालील नागालँडने यंदाच्या प्लेट गटात पाचपैकी तीन सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळविला होता.

गोव्यासह नागालँड संघ २०२५-२६ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट विभागात खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. नागालँडने प्रथमच एलिट गटासाठी पात्रता मिळविली आहे. घरच्या मैदानावर विजयी कामगिरीसाठी ते इच्छुक असतील, मात्र तुलनेत जास्त अनुभवी असलेल्या गोव्याचे आव्हान त्यांच्यासाठी खडतर असेल.

तेंडुलकर जायबंदी; अमूल्यला संधी

तीन फिरकी गोलंदाजांसह गोव्याने मैदानात उतरण्याचे ठरविल्यास डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर फेब्रुवारी २०२२ नंतर प्रथमच रणजी सामना खेळेल. अमूल्यने आतापर्यंत २८ रणजी सामन्यांत ५२ गडी बाद केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर पूर्ण तंदुरुस्त नसून वेगवान गोलंदाजीची धुरा फेलिक्स आलेमाव व हेरंब परब यांच्या खांद्यावर असेल. सलामीचा रोहन कदमही अंतिम अकरा सदस्यीय संघात खेळण्याची शक्यता आहे. सुयश प्रभुदेसाई, के. व्ही. सिद्धार्थ, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ, समर दुभाषी, कश्यप बखले, मोहित रेडकर हे संघातील अन्य खेळाडू असू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT