Karun Nair Injury Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: 'करुण नायर'ची गोव्याविरुद्ध झुंजार खेळी! 'अर्जुन तेंडुलकर'चा भेदक मारा; कर्नाटक पहिल्या दिवसअखेर 5 बाद 222

Karun Nair Karnataka: धीरोदत्त फलंदाजीमुळे गोव्याविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यास कर्नाटकला पहिल्या दिवसअखेर ४ बाद ६५ वरुन ५ बाद २२२ धावा असे सावरता आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वेगवान गोलंदाजांना साह्य करणाऱ्या खेळपट्टीवर कसोटीपटू करुण नायर कर्नाटकाच्या मदतीस धावला. त्याच्या धीरोदत्त फलंदाजीमुळे गोव्याविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यास कर्नाटकला पहिल्या दिवसअखेर ४ बाद ६५ वरुन ५ बाद २२२ धावा असे सावरता आले.

एलिट ब गटातील सामन्यास शनिवारपासून कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या शिमोगा येथील नवुले क्रिकेट स्टेडियमवर सुरवात झाली. दिवसअखेर करुण ८६ धावांवर खेळत होता, त्याने १३८ चेंडूंचा सामना करताना सात चौकार व एक षटकार मारला. श्रेयस गोपाळने त्याला आक्रमक शैलीत साथ दिली.

श्रेयस ४८ धावांवर नाबाद असून त्याने ८४ चेंडूंतील खेळीत पाच चौकार व एक षटकार मारला. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ९४ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. त्यापूर्वी, करुणने अभिनव मनोहर (३७) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली होती. गोव्यातर्फे डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने ४७ धावांत ३ गडी बाद केले. आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध गोव्याचा पाहुणा वेगवान वासुकी कौशिक प्रभावी ठरला. त्याने २४ धावांत २ महत्त्वपूर्ण गडी टिपले.

उपाहारानंतर कर्नाटकची घसरगुंडी

रात्री पडलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळच्या सत्रात सामन्याच्या पहिल्या दिवशी दीड तासांचा खेळ वाया गेला. उपाहारापर्यंतच्या १२ षटकांतील खेळात कर्नाटकच्या सलामीवीरांनी सावध फलंदाजी करताना बिनबाद १५ धावा केल्या होता. दुसऱ्या सत्रातील खेळास सुरवात झाल्यानंतर यजमान संघाची घसरगुंडी उडाली. अर्जुन तेंडुलकरने लागोपाठ दोन धक्के दिल्यामुळे त्यांची २ बाद २६ अशी स्थिती झाली.

कर्णधार मयंक अगरवाल व करुण नायर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण कौशिकने प्रतिस्पर्धी कर्णधारास बाद केल्यानंतर आर. स्मरण याला जास्तकाळ टिकून दिले नाही, त्यामुळे कर्नाटकचा ४ बाद ६५ असा गडगडला. नंतर करुणला अभिनव मनोहर याने चांगली साथ दिल्यामुळे कर्नाटकला सव्वाशे धावांचा टप्पा गाठता आला. अर्जुनने डावातील वैयक्तिक तिसरा गडी बाद करताना अभिनवला बाद करून पाचव्या विकेटची ६४ धावांची भागीदारी भंग केली.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक, पहिला डाव ः ६९ षटकांत ५ बाद २२२ (मयंक अगरवाल २८, करुण नायर नाबाद ८६, अभिनव मनोहर ३७, श्रेयस गोपाळ नाबाद ४८, अर्जुन तेंडुलकर १७-५-४७-३, वासुकी कौशिक १८-७-२४-२, विजेश प्रभुदेसाई १४-३-५७-०, दर्शन मिसाळ ११-०-५६-०, मोहित रेडकर ५-०-१६-०, सुयश प्रभुदेसाई ४-०-८-०).

अगोदरच्या लढतीतील कर्णधारालाच डच्चू

अष्टपैलू दीपराज गावकर याने चंडीगडविरुद्धच्या लढतीत स्नेहल कवठणकरच्या अनुपस्थितीत गोव्याने नेतृत्व केले होते, मात्र कर्नाटकविरुद्धच्या लढतीत जलदगती माऱ्यास साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाज खेळविण्यासाठी दीपराजलाच संघातून बाहेर ठेवावे लागले. या लढतीसाठी गोव्याने संघात एकूण तीन बदल केले. दीपराजसह कश्यप बखले व हेरंब परब संघाबाहेर गेले, तर कर्णधार स्नेहल कवठणकर, पाहुणा वासुकी कौशिक, विजेश प्रभुदेसाई यांना अकरा सदस्यीय संघात स्थान मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT