Arjun Tendulkar Ranji Trophy, Goa vs Madhya Pradesh Ranji Match, Lalit Yadav Bowling Performance Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy 2025: तेंडुलकर-वासुकीला विकेट, तरी सौराष्ट्राच्या फलंदाजांचे गोव्यावर वर्चस्व; पहिल्या दिवशी भक्कम धावसंख्या

Goa Vs Saurashtra: सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. चिराग जानी (१८) याला वासुकी कौशिक याने लवकर पायचीत बाद केले. हा अपवाद सौराष्ट्राच्या फलंदाजांना गोव्याचे गोलंदाज भारी ठरू शकले नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मध्य फळीतील अर्पित वसावडा (८८), प्रेरक मांकड (नाबाद ८८), जय गोहिल (६८) यांच्या दमदार अर्धशतकांमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गट लढतीत सौराष्ट्राने गोव्यावर पहिल्या दिवशी वर्चस्व राखले. राजकोट येथे रविवारपासून सुरू झालेल्या या चार दिवसीय लढतीच्या पहिल्या दिवसअखेर यजमान संघाने ४ बाद ३१७ धावा अशी भक्कम वाटचाल केली.

सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. चिराग जानी (१८) याला वासुकी कौशिक याने लवकर पायचीत बाद केले. हा अपवाद सौराष्ट्राच्या फलंदाजांना गोव्याचे गोलंदाज भारी ठरू शकले नाहीत. सलामीच्या हार्विक देसाई (४५) याचे अर्धशतक पाच धावांनी हुकले. अर्जुन तेंडुलकरने त्याला त्रिफळाचीत बाद केले.

नंतर जय व अर्पित यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केल्यामुळे सौराष्ट्राला मजबूत धावसंख्येच्या दिशेने कूच करता आली. दर्शन मिसाळच्या गोलंदाजीवर राजशेखर हरिकांतने जय याला यष्टीचीत बाद केल्यानंतर अर्पित-प्रेरक जोडी गोव्यासाठी डोकेदुखी ठरली.

अर्पितने मोहित रेडकरच्या गोलंदाजीवर गोव्याचा कर्णधार स्नेहल कवठणकरच्या हाती झेल दिल्यामुळे चौथ्या विकेटची ९७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. प्रेरकला दिवसअखेर सम्मर गज्जर याने चांगली साथ दिली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ६२ धावांची अभेद्य भागीदारी केली. या लढतीसाठी गोव्याने मध्य प्रदेशविरुद्ध पराभूत झालेला संघच कायम ठेवला. राजकोटची खेळपट्टी फलंदाजांना साथ देते हा लौकिक रविवारी पुन्हा दिसला.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र, पहिला डाव ः ९० षटकांत ४ बाद ३१७ (हार्विक देसाई ४५, चिराग जानी १८, जय गोहिल ६८, अर्पित वसावडा ८१, प्रेरक मांकड नाबाद ८८, सम्मर गज्जर नाबाद १२, अर्जुन तेंडुलकर १९-१-९२-१, वासुकी कौशिक २१-८-३७-१, दीपराज गावकर १-०-३-०, दर्शन मिसाळ २२-१-७७-१, मोहित रेडकर १४-१-५६-१, ललित यादव १२-२-४७-०, अभिनव तेजराणा १-०-५-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usman Khawaja Retirement: "मी पाकिस्तानी- मुस्लिम म्हणूनच मला..."; निवृत्तीच्या वेळी ख्वाजाचे गंभीर आरोप Watch Video

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

World Introvert Day 2026: अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता 'अपोलो'सारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात..

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

SCROLL FOR NEXT