Snehal Kavthankar  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: धुवांधार स्नेहल! कारकिर्दीत चौथ्यांदा पाचशेहून जास्त धावा; गोव्याच्या फलंदाजीचा ठरतोय ‘आधार’

Snehal Kavthankar: स्नेहल कवठणकर याच्यासाठी गतमोसम तुलनेत निराशाजनक ठरला, मात्र यंदा त्याची बॅट कडाडली. नव्या आत्मविश्वासाने खेळत २९ वर्षीय शैलीदार फलंदाज पुन्हा गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचा आधारस्तंभ बनला.

गोमन्तक डिजिटल टीम

Snehal Kavthankar Goa Ranji Cricket Team

पणजी: स्नेहल कवठणकर याच्यासाठी गतमोसम तुलनेत निराशाजनक ठरला, मात्र यंदा त्याची बॅट कडाडली. नव्या आत्मविश्वासाने खेळत २९ वर्षीय शैलीदार फलंदाज पुन्हा गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचा आधारस्तंभ बनला. यावेळी त्याने कारकिर्दीत चौथ्यांदा मोसमात पाचशेहून जास्त धावा केल्या आहेत.

स्नेहलने यंदा रणजी प्लेट विभागातील पाच सामन्यांत १७१च्या सरासरीने ६८४ धावा केल्या असून अजून अंतिम लढत बाकी आहे. तुलनेत त्याने गतमोसमात (२०२३-२४) रणजी स्पर्धेतील सहा सामन्यांत २०.७२च्या सरासरीने फक्त २२८ धावा केल्या होत्या. फेब्रुवारी २०१५ मध्ये आंध्रविरुद्ध रणजी क्रिकेट पदार्पण केल्यानंतर स्नेहलने ५८ सामन्यांत ४५.४३च्या सरासरीने ९ शतके व १३ अर्धशतकांच्या मदतीने ३८६२ धावा केल्या आहेत.

सफल ठरलेला मोसम

यंदा रणजी मोसमात स्नेहलने मणिपूरविरुद्ध पहिल्या सामन्यात ४१ धावा केल्या, सिक्कीमविरुद्ध तो फलंदाजीस उतरला नाही. नागालँडविरुद्ध पहिल्या डावात चार धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने शानदार ७५ धावा करून कस लागणाऱ्या खेळपट्टीवर गोव्याच्या विजयाचा पाया रचला. जानेवारी २०२४ मध्ये म्हैसूर कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ८३ धावा केल्यानंतर स्नेहलचे हे नऊ डावानंतर अर्धशतक होते. मिझोरामविरुद्ध अहमदाबाद येथे अडीचशे धावा केल्यानंतर अरुणाचल प्रदेशविरुद्ध पर्वरीत विक्रमी त्रिशतकी खेळी केली.

तिसरे वेगवान त्रिशतक

अरुणाचल प्रदेशविरुद्ध स्नेहलने पर्वरी येथे गुरुवारी २१५ चेंडूंत ४५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ३१४ धावा केल्या. या खेळीत त्रिशतकी मजल त्याने २०५ चेंडूत गाठली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान त्रिशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांत तो दुसरा, तर एकंदरीत तिसरा आहे. हैदराबादच्या तन्मय अगरवाल याने २०२३-२४ मोसमात सिकंदराबाद येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध १४७ चेंडूंत त्रिशतक केले होते. दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत बोर्डर संघाच्या मार्को मराईस याने ईस्ट प्रोव्हिन्सविरुद्ध २०१७-१८ मध्ये ईस्ट लंडन येथे १९१ चेंडूंत त्रिशतक झळकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT