Professional League 2024 Canva
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: ..अखेर चर्चिल ब्रदर्सने चाखली विजयाची चव! कुठ्ठाळी व्हिलेजर्सचा निसटता पराभव

Professional Football League 2024: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत ओळीने चार सामने गमावल्यानंतर माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने सोमवारी भरपाई वेळेतील गोलमुळे पहिल्या विजयाची चव चाखली. त्यांनी कुठ्ठाळी व्हिलेजर्सला ३-२ असे निसटते हरविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Professional League 2024

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत ओळीने चार सामने गमावल्यानंतर माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने सोमवारी भरपाई वेळेतील गोलमुळे पहिल्या विजयाची चव चाखली. त्यांनी कुठ्ठाळी व्हिलेजर्सला ३-२ असे निसटते हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्यातील अखेरची काही मिनिटे संघर्षपूर्ण ठरली. ५६व्या मिनिटास लुनमिन्लेन हाओकिप याने चर्चिल ब्रदर्ससाठी पहिला गोल केला. नंतर ८५व्या मिनिटास स्टेन्डली फर्नांडिसने आघाडी २-० अशी भक्कम केली.

मात्र कुठ्ठाळी व्हिलेजर्सने प्रतिकार करताना रोनिल आझावेदो याने ८७व्या, तर व्हेलरॉय कार्व्हालो याने ९०+७व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे २-२ अशी बरोबरी साधली. बदली खेळाडू ॲश्ली कोली याने ९०+८व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने विजय प्राप्त केला.

चर्चिल ब्रदर्सचे आता पाच लढतीतून तीन गुण झाले आहेत, तर दुसऱ्या पराभवामुळे कुठ्ठाळी व्हिलेजर्सने पाच लढतीनंतर पाच गुण कायम राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप असोसिएशनला माजी मंत्री पाऊसकरांचा जाहीर पाठिंबा; 'त्यांची मागणी रास्त...'

Goa Unemployment: गोव्यातल्या घरफोडीच्या घटनांचा बेरोजगारीशी संबंध? काँग्रेस नेत्याने मांडले तर्क

Migrants Problem in Goa: 'गोमंतकीयांचे' भवितव्य धूसर..! मुख्यमंत्र्यांनी मुद्द्यावर ठेवले बोट; 'काय बिघडलंय गोव्यात' नक्की वाचा

Goa Live Updates: फोटो पत्रकार संतोष मिरजकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांना 7 दिवसांचा अल्टिमेटम!

SCROLL FOR NEXT