Odisha Defeats Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Santosh Trophy: ओडिशानं गोव्याची उडवली दाणादाण, चुरशीच्या लढतीत मारली बाजी

Odisha Defeats Goa: संतोष करंडक राष्ट्रीय सीनियर पुरुष फुटबॉल स्पर्धेत गतउपविजेत्या गोव्याला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: संतोष करंडक राष्ट्रीय सीनियर पुरुष फुटबॉल स्पर्धेत गतउपविजेत्या गोव्याला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबाद येथील डेक्कन अरेना मैदानावर मंगळवारी ओडिशाने त्यांच्यावर २-० फरकाने मात केली.

गोव्याला (Goa) स्पर्धेतील ब गटात अगोदरच्या लढतीत केरळने ४-३ फरकाने पराभूत केले होते. लागोपाठ दोन सामने गमावल्यामुळे गोव्याचा संघ संकटात सापडला आहे. स्पर्धेत एकही गुण नसलेला हा एकमेव संघ आहे. गोव्याचा गट साखळीतील पुढील सामना १९ डिसेंबरला तमिळनाडूविरुद्ध खेळला जाईल.

मंगळवारी गोव्याला ओडिशाने (Odisha) उत्तरार्धात दोन गोल करून धक्का दिला. सामन्याच्या ६०व्या मिनिटात राहुल मुखी याने, तर ६५व्या मिनिटात कार्तिक हंटल याने गोल केल्यामुळे ओडिशाला स्पर्धेतील पहिला विजय नोंदविता आला. त्यांचे आता दोन लढतीतून तीन गुण झाले आहेत. मागील लढतीत ओडिशाला दिल्लीने दोन गोलने पराभूत केले होते. ब गटातील आणखी एका सामन्यात मंगळवारी दिल्लीने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना तमिळनाडूस २-० फरकाने हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT