Nitish Belurkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rapid Chess Tournament 2024: रॅपिड मानांकन स्पर्धेत 'नितीश' अजिंक्य! 28 FIDE गुणांची कमाई; उझेबेकिस्तान स्पर्धेतही चमक

Rapid Ranking Chess Tournament: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) नितीश बेलुरकर याने पुण्यात झालेल्या श्री महेश्वरानंद सरस्वती स्मृती खुल्या रॅपिड मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

गोमन्तक डिजिटल टीम

Rapid Ranking Chess Tournament Winner Nitish Belurkar

पणजी: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) नितीश बेलुरकर याने पुण्यात झालेल्या श्री महेश्वरानंद सरस्वती स्मृती खुल्या रॅपिड मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत भारतासह इस्त्राईल, जर्मनी, अमेरिका, नेदरलँड्समधील मिळून ४४६ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.

नितीशने नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत अपराजित राहताना साडेआठ गुणांची कमाई केली. शिवाय त्याने २८ फिडे मानांकन गुणांचीही प्राप्ती केली. फिडे मास्टर आकाश दळवी व सुयोग वाघ यांचे प्रत्येकी आठ गुण झाले. त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. गोव्याचा आयएम अमेया अवदी याने साडेसात गुण नोंदविले. आणखी एक गोमंतकीय खेळाडू अनीश नाईक याने दोघा आयएम खेळाडूंना पराभूत करताना साडेसहा गुण नोंदविले.

उझेबेकिस्तानमधील स्पर्धेतही चमक

पुण्यातील स्पर्धेपूर्वी नितीश उझबेकिस्तानमधील प्रेझिडंट्स कप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या स्पर्धेत त्याने सहा गुणांसह चौदावा क्रमांक मिळविताना सात एलो रेटिंग गुणही मिळविले होते. या स्पर्धेत नितीशने उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर मादामिनोव मुखिद्दीन याला नमविले होते, तर भारतीय ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक याला बरोबरीत रोखले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT