Manolo Marquez, FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: किमयागार मार्केझ! एफसी गोवासाठी सर्वाधिक विजय, सुपर कपला गवसणी, दोनवेळा ISL ची उपांत्य फेरी

Manolo Marquez: मानोलो मार्केझ यांनी जून २०२३ मध्ये एफसी गोवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत धडपडत होता.

Sameer Panditrao

पणजी: मानोलो मार्केझ यांनी जून २०२३ मध्ये एफसी गोवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत धडपडत होता. दोन वर्षांनंतर या संघाने करंडक जिंकण्याचा दुष्काळ संपविला, तसेच दोन वेळा आयएसएल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना जास्त विजयांचीही नोंद केली.

स्पेनमधील ५६ वर्षीय मार्केझ एफसी गोवासाठी किमयागार ठरले. स्पेनचेच कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील संघाला २०२२-२३ आयएसएलमध्ये सातवा क्रमांक मिळाला होता. १ जून २०२३ रोजी मार्केझ यांनी एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने करारपत्रावर सही केली. ३ मे २०२५ रोजी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियवर सुपर कप जिंकलेल्या या संघाने देशातील मातब्बर संघाचा लौकिक पुन्हा प्राप्त केला.

लागोपाठ दोन मोसम आयएसएल कपची उपांत्य फेरी गाठली. सर्जिओ लोबेरा प्रशिक्षक असताना एफसी गोवाने २०१९ मध्ये सुपर कप, तसेच २०1९-२० मध्ये लीग शिल्डचा मान मिळविला होता. २०२१ मध्ये एएफसी चँपियन्स लीगमध्ये खेळल्यानंतर आता चार वर्षांनंतर आशिया पातळीवरील एएफसी चँपियन्स लीग २ प्राथमिक फेरीसाठी पात्रता मिळविली आहे.

स्पेनमधील ला-लिगा स्पर्धेत प्रशिक्षकाची भूमिका निभावलेले मार्केझ २०२० मध्ये भारतात दाखल झाले. हैदराबाद एफसीला २०२१-२२ मध्ये आयएसएल कप जिंकून देणारे हे कल्पक आणि धूर्त प्रशिक्षक आता एफसी गोवातर्फेही विजेते ठरले.

गतवर्षी मार्केझ यांनी एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबरोबर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपदही स्वीकारले. २०२४-२५ मोसमात त्यांनी दुहेरी जबाबदारी नेटाने पेलली व यशही प्राप्त केले. करारानुसार जूनपासून ते भारतीय संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक असतील. गतवर्षी सप्टेंबरमध्ये एफसी गोवाने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी पटकावली, तेव्हा मार्केझ राष्ट्रीय संघासमवेत होते, मात्र एफसी गोवासाठी नियोजन त्यांचेच होते.

गोव्यातील वातावरण भावले

एकंदरीत गोव्यातील वातावरण या स्पॅनिश मार्गदर्शकास चांगलेच भावले आहे. सुपर कप जिंकल्यानंतर मार्केझ म्हणाले, की ‘‘हा करंडक जिंकल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. या समूहासाठी त्यात फक्त खेळाडूंसाठीच नव्हे, तर संपूर्ण क्लब स्टाफ व इतरांसाठी मी खूप आनंदित आहे. मला वाटतं, करंडक जास्त जिंकले नसले तरी संघटनात्मक दृष्टीने एफसी गोवा भारतातील सर्वोत्तम क्लब आहे. जेव्हा तुम्ही प्रशिक्षक असता, तेव्हा अशा संघाला प्रशिक्षण देणे स्वप्नवत असते, कारण इथले वातावरण सर्वोत्कृष्ट आहे.’’

एफसी गोवातर्फे आकडेवारीत प्रशिक्षक मार्केझ

सर्व स्पर्धांत ः सर्वाधिक ३८ विजय, एकूण ६२ सामने

आयएसएल स्पर्धेत ः ५१ सामने, २९ विजय, १२ बरोबरी, १० पराभव, ८८ गोल

आयएसएलमध्ये ः २०२३-२४ मध्ये साखळी फेरीत तृतीय, ‘कप’मध्ये उपांत्य फेरी; २०२४-२५ मध्ये साखळी फेरी द्वितीय, ‘कप’मध्ये उपांत्य फेरी

सुपर कप स्पर्धेत ः २०२४ मध्ये साखळी फेरीत गारद, २०२५ मध्ये विजेते

ड्युरँड कप स्पर्धेत ः २०२३ मध्ये उपांत्य फेरी

आयएसएल स्पर्धेत २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये सलग १२ सामने अपराजित (८ विजय, ४ बरोबरी)

२०२४-२५ मध्ये सलग २३ साखळी सामन्यांत गोल नोंदविण्याचा आयएसएल विक्रम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT